एक्स्प्लोर

Uddhav Thackrey: 'आपल्या सत्तेच्या काळात दिलेला स्टे यांनी काढला...', पुण्यातील पूरस्थितीवर उध्दव ठाकरेंचं परखड भाष्य

Uddhav Thackrey: आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता. तो स्टे यांनी काढला, त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली. हा विकास म्हणायचा हा विकास नाही विखार आहे अशा शब्दांत ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.

Uddhav Thackrey:  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा आज (3 ऑगस्ट) पार पडत आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या गणेश कला क्रिडा या ठिकाणी हा शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पुण्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित आहेत. या मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील पूरस्थितीवर देखील भाष्य केलं आहे. 

आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यातील कामांना स्टे दिला होता. तो स्टे यांनी काढला, त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली. हा विकास म्हणायचा हा विकास नाही विखार आहे अशा शब्दांत ठाकरेंनी (Uddhav Thackrey) हल्लाबोल केला आहे. 

पुण्यातील नद्यांचे प्रवाह बदलण्याचा यांचा प्रयत्न आहे. नदी सुशोभीकरण प्रकल्पाला आपल्या सत्तेच्या काळात स्थगिती दिली होती. पण मोठ्या प्रमाणात नदीत राडारोडा टाकला जातोय. हा भाजपला झालेला सत्तेचा विकार आहे. ज्या कंत्राटदाराने संसद भवन बांधलं. तोच गुजरातचा कंत्राटदार पुण्यातील नदी सुशोभीकरण प्रकल्प करतोय. तो देखील गुजरातचा होता. पुणेकरांनी यासाठी रस्त्यावर उतरायला हवे, असंही यावेळी उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackrey) म्हटलं आहे. 

आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता यांनी तो स्टे काढला

सत्तेत होतो तेव्हा मी पुण्याच्या कामाची दखल घेतली नव्हती. कारण पुण्यात काही सुभेदार बसले होते. आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता. तो स्टे यांनी काढला. त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली. हा विकास म्हणायचा. हा विकास नाही. विखार आहे. म्हणूनच आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे, अंसही ठाकरे (Uddhav Thackrey) यावेळी म्हणालेत. 

'अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा'

"अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा आले होते. पुण्यात येऊन भाषण करुन गेले. त्यांना संघाचे हिंदुत्व मान्य आहे का? चंद्राबाबु नायडु, नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणसं आहेत का? असा सवाल त्यांनी केला. 

''माझ्या पायाशी कलिंगड ठेवलंय, पण मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही''

आता लढाई मैदानात आहे, मी मुंबईत म्हणालो की एक तर मी तर राहीन किंवा तू तरी राहशील. इथे एक पोस्टर लागलंय. त्यातील फोटोत माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवलंय. काहींना वाटलं की मी त्याला आवाहन दिलेय. पण, ढेकणांना आवाहन द्यायचं नसतं तर बोटाने चिरडायचं असतं. मी आवाहन द्यावं इतका मोठा तू नाहीस. काहीजणांना वाटलं की मी त्याला आवाहन दिलेय. तर हे आवाहन चोर-दरोडेखोरांच्या पक्षाला आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नाव न घेता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय. तसेच, मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे, मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळक्यांचा पक्ष, असे म्हणत भाजपवरही निशाणा साधला.   

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Embed widget