Tukaram Maharaj Palkhi : तुकोबांच्या पालखीचा मार्ग बदलला ऊरळीकर संतापले, पालखीची वाट अडवली
उरुळी कांचनमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखीचा नगारा अडवण्यात आलेला आहे. उरुळी कांचन गावामध्ये दरवर्षीच्या मार्गावरून पालखी घेऊन न गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पालखी थांबवलेली आहे.
Ashadhi Wari 2024: पंढरपूरकडे जााणारी जगद्गुरु संत तुकाराम (Sant Tukaram Maharaj) महराजांची पालखी ऊरळी कांचनमध्ये (Uruli Kanchan) अडवण्यात आलाी आहे. उरुळी कांचन गावामध्ये द गावकऱ्यांनी ही पालखी अडवली असल्याची माहिती समोर येत आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गात छोटासा बदल करण्यात आला. मात्र दरवर्षी ज्या ठिकाणाहून ही पालखी जाते त्या गावातील नागरिकांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळेच पालखी अडवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे ग्रामस्थ काही प्रमाणात आक्रमक झाले आहे.
उरुळी कांचनमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखीचा नगारा अडवण्यात आलेला आहे. उरुळी कांचन गावामध्ये दरवर्षीच्या मार्गावरून पालखी घेऊन न गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पालखी थांबवलेली आहे. विश्वस्त आणि उरुळीकांचनचे ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद झाला दरम्यान घटनास्थळी पुणे अधीक्षक पंकज देशमुख दाखल झाले असून ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहे.पालखी लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून यवतच्या दिशेने मुक्कामी चालला आहे.
गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
तुकोबांची यवत येथे जाणारी पालखी ऊरळी कांचनमध्ये नेहमीच्या ठिकाणी थांबली नाही. नेहमीच्या मार्गात बदल करण्यात आल्याने हा निर्णय मान्य नसल्याचे म्हणत गावकऱ्यांनी पालखीचा नगारा अडवली आहे. तसेच गावकऱ्यांनी रस्ता रोको केला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस अधिक्षक आणि काही स्थानिक ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर पालखी पुढे काढण्यात आली. मात्र ग्रामस्थ अजूनही आंदोलन करता आहेत. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, त्यांच्याकडून गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर यावर लवकरच तोडगा काढू, अशी समजूत घातली जात आहे.
वारकरी गाठतात साधारण 250 किलोमीटरचा पायी पल्ला
वारकरी देहू ते पंढरपूर असा साधारण 250 किलोमीटरचा पल्ला पायी पार करतात. मात्र, या वारकऱ्यांना ना कुठे शीण येत ना वारकरी दमतात. कारण वारकरी नाचत गात टाळ वाजवत आणि हरिनामाचा गजर करत पुढे चालतात. फुगडी भजन करत मजल दर मजल करत पंढरपूर गाठत असतात. वारीत शेतकरी मंडळी जास्त प्रमाणात सहभागी होतात. तसेच नोकरदार, सामाजिक क्षेत्रात काम करणारे तरुण तरुणी देखील मोठ्या प्रमाणात या वारीत सहभागी होतात.
हे ही वाचा :
वारकरी संप्रदायाचा अनोखा सन्मान! पंढरपूरच्या आषाढी वारीला जागतिक वारसा मिळणार , केंद्र सरकार यूनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार