(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Traffic News : पुण्यात कर्वे रोडवर डबल डेकर पुल बांधला मात्र ट्राफिक 'जैसे थेच'
Pune Traffic News : मागील काही महिन्यांपासून पुणेकरांना (Pune News) वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे. कर्वे रस्त्यांची वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी पुण्यातील पहिला डबल डेकर पूल बांधण्यात आला.
Pune traffic news : मागील काही महिन्यांपासून पुणेकरांना (Pune traffic) वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे. कर्वे मार्गावरील वाहतूक कोंडी (Traffic Jam) कमी होण्यासाठी पुण्यातील पहिला डबल डेकर पूल बांधण्यात आला. मात्र त्या पुलाचा पुणेकरांना काहीही उपयोग होत नसल्याचं (Pune) चित्र आहे. कर्वे मार्गावरील वाहतूक अजूनही जैसे थेच आहे. उपाययोजना करुनही वाहतूक कोंडी 'जैसे थेच' असल्याचं चित्र आहे.
पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आणि मेट्रो (Pune Metro) यांनी एकत्र येत या पुलाचं बांधकाम केलं होतं. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पुणे महापालिकेने 30 कोटी रुपये, तर महा मेट्रोने 26 कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यानंतर मोठ्या धुमधडाक्यात या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. कर्वे रस्त्यावरील वाहतूक या पुलामुळे कमी होणार, असा दावा करण्यात आला होता. मात्र या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही आहे.
पुण्यातील पहिल्या डबल डेकर उड्डाणपुलाचं काम 2019 च्या सुरुवातीला सुरू करण्यात आलं होतंं. उड्डाणपुलाची एकूण लांबी 550 मीटर आहे. लॉ कॉलेज रोड, म्हात्रे पुलावरून नळ स्टॉप चौकात येणाऱ्या आणि कर्वे रोडकडे जाणाऱ्या वाहनांना या पुलाचा फायदा होईल आणि परिणामी वाहतूक कोंडी होणार नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं.
पुण्यातील कर्वे रस्त्यावर मागील अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी होते. सकाळी आणि संध्याकाळी या मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा अनेक पुणेकरांना त्रास होतो शिवाय त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचायला देखील उशीर होतो. त्यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागतो.
विद्यापीठ परिसरातही वाहतूक कोंडी कायम
कोरोना (Corona) लॉकडाऊनमध्ये (Lockdown) विद्यापीठासमोरील पूल मेट्रोच्या कामासाठी अडथळा होत असल्यानं पाडण्यात आला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या पुलाचं काम सुरू करण्यात येणार होतं. मात्र दोन वर्ष काम सुरु झालं नव्हतं. त्यामुळे शिवाजी नगर ते विद्यापीठ चौक आणि औंध ते विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात रोज वाहतूक कोंडी होते. या मार्गावरील दुसऱ्या पूलाचा आराखडा तयार आहे. मात्र नवा पूल तयार व्हायला 2025 उजाडणार असल्याचं सांगण्यात आहे. या पुलाचं काम काही प्रमाणात सुरु झालं आहे. या पुलासाठी पुणेकरांना अजून दोन वर्ष वाट बघावी लागणार आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडी सुटणार का? की जैसे थेच राहिलं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :