(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune heritage walk: तरुणांमध्ये इतिहास रुजवण्यासाठी पुणे पालिकेकडून विविध ठिकाणी 'हेरिटेज वॉक'
पुणे महानगरपालिकने (PMC) पुणेकरांमध्ये आणि पर्यटकांमध्ये शहराच्या इतिहासाची माहिती आणि ओळख करुन देण्यासाठी हेरिटेज वॉक सुरू केले आहे.
Pune heritage walk: पुणे महानगरपालिकने (PMC) पुणेकरांमध्ये आणि पर्यटकांमध्ये शहराच्या इतिहासाची माहिती आणि ओळख करुन देण्यासाठी हेरिटेज वॉक सुरू केले आहे. या मार्फत अनेक पुणेकरांना आणि आलेल्या पर्यटकांना पुण्याच्या ऐतिहासिक वारस्याचं दर्शन घडणार आहे. त्यासोबतच इतिहाससुद्धा त्यांच्या मनाल रुजवला जाणार आहे.
शहरात सुमारे 250 हेरिटेज वास्तू आहेत. पुण्याच्या मध्यभागी असलेला शनिवारवाडा, लाल महाल, विश्रामबागवाडा, नानावडा, कसबा गणपती आणि महात्मा फुले मंडई शहरातील हेरिटेज वास्तूंच्या श्रेणी 1 मध्ये आहेत. झपाट्याने प्रगती करणाऱ्या युगात त्याचे समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व जतन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे शहराच्या जुन्या भागात हेरिटेज वॉकचा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून या ठिकाणी नागरिकांना व पर्यटकांना वॉक करताना हेरिटेज वास्तू दाखविल्या जातील. या ठिकाणांचे ऐतिहासिक महत्त्वही त्यांना अवगत केले जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
'पुणे जाणून घ्या', 'शनिवार पेठ-18 वे शतक', 'काबा-द बिगिनिंग', 'सोमवार रास्ता-टेम्पल टाऊन', 'शुक्रवार - पूर्वीची उपनगरे' आणि 'गॉथिक पुणे - ब्रिटिश' या थीमवर हेरिटेज वॉकचे नियोजन केले आहे. युग'. ‘पुणे जाणून घ्या’ हा उपक्रम प्रथम सुरू केला जाईल आणि प्रतिसादानुसार इतर वाटचाल सुरू केली जाणार असल्याचं पालिकेने सांगितलं आहे.
पुण्याला ऐतिहासिक वारसा आहे. पुण्यातील अनेक ठिकाणं इतिसाहाचे साक्षीदार आहे. मात्र याबाबत अनेकांना माहिती नसते. इतिहास महिती नसतो. ठिकाणांवर झालेले किस्से माहिती नसतात. या सगळ्यांची तरुण पीढीला ओळख व्हावी आणि इतिहास माहिती व्हावा, यासाठी हे हेरिटेज वॉक सुरु केलं आहे.
तरुणांचा मोठा सहभाग
सध्या अनेक तरुण व्लॉग करतात. या माध्यमातून ते पुण्याची माहिती देतात. याच व्लॉगर्ससाठी इतिहास जाणून घेण्याची ही मोठी संधी आहे. त्यामुळे या हेरिटेज वॉकमध्ये तरुणांचा मोठा सहभाग बघायला मिळणार अशी आशा आहे. जुन्या पीढीच्या गोष्टी पुढच्या पीढीत रुजवण्यासाठी हा पालिकेचा मोठा प्रयत्न आहे. जस्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून इतिहास जाणून घ्या, असं आवाहन करण्यात येत आहे.