एक्स्प्लोर

Nirmanala Sitaraman In Indapur : निर्मला सीतारमण यांच्यावर राष्ट्रवादीकडून प्रश्नांचा भडीमार, पोलिसांनी थेट फलक काढला!

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmanala Sitaraman )  यांच्या स्वागतार्थ बारामती (Baramati)  लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे लावलेला वादग्रस्त बॅनर अखेर हटवण्यात आला आहे.

Nirmanala Sitaraman In Indapur :  देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmanala Sitaraman )  यांच्या स्वागतार्थ बारामती (Baramati)  लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे लावलेला वादग्रस्त बॅनर अखेर हटवण्यात आला आहे. भाजपच्या मिशन बारामती (Mission Baramati) या कार्यक्रमांतर्गत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौरा करत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. असाच बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी निमगाव केतकी येथे लावला होता.  त्या बॅनरवरती केंद्र सरकारच्या धोरणांवर उपरोधिक टीका करण्यात आली होती. या टिकेमुळे बॅनर हटवण्यात आला आहे.

बॅनरमध्ये काय होतं?

त्या बॅनरमध्ये विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने खोचक टीका केली होती. अनेक महागाईच्या किंवा बेरोजगारीच्या निर्णयाबाबत त्यांचं उपाहासात्मपणे अभिनंदन करण्यात आलं होतं. पेट्रोल डिझेलने 100 पार केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन,  स्वयंपाकाच्या गॅसने हजारी पार केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन,  जनसामान्यांच्या रोजी रोजीवर जीएसटी लावल्याबद्दल हार्दिक अभिनंदन,  सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, बारामती लोकसभा हे एक विकासाचे रोल मॉडेलला पहिल्या वेळी भेट दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! अशा आशयाचे मजकूर त्यावर लिहिण्यात आलं होतं. तो बॅनर अखेर इंदापूर पोलीस प्रशासनाने हटवला आहे.

बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावण्यात आलं होतं 

निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करणारं हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावण्यात आलं होतं. भाजपने वाढवलेली महागाई, त्यांच्या सत्तेत घेण्यात आलेले निर्णय या विरोधात भाष्य करणारं हे बॅनर होतं. उपहासात्मक भाषेत निर्मला सीतारमण यांचं अभिनंदन करण्यात आलं होतं.  बॅनरमुळे राजकीय वातावरण पेटू शकतं. त्यामुळे वादही निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे टीका असलेले बॅनर पोलिसांकडून काढण्यात आलं आहे.

 बारातमी दौऱ्यावर विरोधकांचा डोळा

निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यावर विरोधकांचा डोळा आहे. त्यांच्यावर दौऱ्यापुर्वीच विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. त्यांच्या भाषेवर देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील टीका केली होती. मात्र दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी निर्मला सीतारमण यांनी पुण्यात मराठीतून भाषण या टीकेला उत्तर दिलं होतं. बारामतीला भाजप संघटना मजबूत करायला मी बारामतीचा दौरा करत आहे. बारामतीला टार्गेट करायला मी बारामतीत जाणार नाही आहे, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायला हवं,  भारतात सगळीकडे आम्ही लक्ष घातले आहे, फक्त बारामती नाही, असं वक्तव्य निर्मला सीतारमण यांनी केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 5 PM  : 28 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut : मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणाSahil Khan Arrest : साहिल खानला महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अटकLok Sabha 2024 : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Mumbai Crime : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री, एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
Supriya Sule on Ajit Pawar : मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
Embed widget