एक्स्प्लोर

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मुलींचा जन्मदर घसरला

राज्यात गर्भलिंग निदान चाचणीला कायद्यानुसार बंदी आहे. असं असताना मुलींच्या जन्मदरात जर घट होत असेल तर गर्भलिंग निदान चाचणी न करण्याच्या कायद्याची कठोर अमलबजावणी राज्यात होते की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

पुणे : संपूर्ण देशात महाराष्ट्र या राज्याची पुरोगामी राज्य म्हणून ओळख असताना काही बाबी मात्र चिंता वाढवणाऱ्या आहेत. एकीकडे हिंगणघाट सारखी घटना जिथे प्राध्यापिकेला भर रस्त्यात जाळून टाकण्यात आले. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातच पुण्या सारख्या जिल्ह्यात ज्याला विद्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते त्या शहरात मुलींचा जन्मदर घटत आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते विवेक वेलणकर यांना मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात मुलींचा जन्मदारात दर हजारी तब्बल 23 ने घसरणं झाली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2016 ते 2019 या कालावधीत जन्मदर घटल्याचे स्पष्ट दिसत आहे. 2016 मध्ये हजारी 932 असणारा मुलींचा जन्मदर 2017 मध्ये 926 होता. तर जन्मदर 2018 मध्ये मुलींचा जन्मदर 927 पर्यंत आला. हाच दर वर्ष 2019 या एकाच वर्षात 904 पर्यंत खाली घसरला आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटलं जातं आणि तिथेच मुलींचा जन्मदर खाली घसरल्याने चित्र नक्कीच चिंताजनक आहे. राज्यात गर्भलिंग निदान चाचणीला कायद्यानुसार बंदी आहे. असं असताना मुलींच्या जन्मदरात जर घट होत असेल तर गर्भलिंग निदान चाचणी न करण्याच्या कायद्याची कठोर अमलबजावणी राज्यात होते की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ नुकताच राज्याच्या आर्थिल अहवालात देखील राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात वर्ष 2018 मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या 35,497 घटना घडल्या. वर्ष 2019 मध्ये हे प्रमाण वाढून 37,567 घटना घडल्या. वर्ष 2017 मध्ये बलात्काराचे गुन्हे 4320 होते तर 2018 मध्ये 4974 ते वाढून वर्ष 2019 मध्ये 5412 झाले. मुलींचे अपहरण आणि पळवून नेण्याच्या घटनांमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ष 2017 मध्ये 6248 गुन्ह्यांची नोंद झाली होती तर 2018 मध्ये या गुन्ह्यांची संख्या 6825 झाली तर 2019 मध्ये 8382 झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget