एक्स्प्लोर
दगडूशेठ हलवाई मंदिरात शहाळे महोत्सव, 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आज शहाळे महोत्सवाचं आयोजन करण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे वैशाख पौर्णिमेनिमित्त मंदिरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला.

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आज शहाळे महोत्सवाचं आयोजन करण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे वैशाख पौर्णिमेनिमित्त मंदिरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला. गणपती बाप्पांना तब्बल पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक जयंती हा अवतार झाला होता. वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावं, दुष्काळ,पाण्याचे दुर्भिक्ष शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलं. तसंच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे. या महोत्सवावेळी गणेश भक्तांनी उपस्थित राहून या सोहळ्याच्या आनंद घेतला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























