एक्स्प्लोर
टॅक्सी चालकाचा प्रामाणिकपणा, 10 लाख रुपयांची बॅग पोलिसांना सुपूर्द
पुणे : विश्रांतवाडी परिसरात एक व्यापारी टॅक्सीमधून जात असताना घाईगडबडीत त्याचे दहा लाख रूपये टॅक्सीत विसरले. पण टॅक्सी चालकाने प्रामाणिकपणा दाखवून ते दहा लाख रुपये विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणून दिले.
शनिवारी रात्री अनिल पवार या टॅक्सी चालकाने आशिष भन्साली या व्यापाऱ्याला विश्रांतीवाडी परिसरात सोडले. पण घाईगडबडीत भन्साली यांची बॅग टॅक्सीतच राहिली.
काही काळानंतर पवारला आपल्या गाडीतील प्रवाशाची बॅग विसरली असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्याने ती बॅग विश्रांतवाडी पोलिसांना सुपूर्द केली.
यानंतर बॅगे हरवल्याची तक्रार घेऊन आशिष भन्साली विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आले. पोलिसांनी बॅग भन्सालीचीच असल्याची पडताळणी करुन त्यांना ती बॅग परत केली. पण टॅक्सी चालकाच्या प्रामाणिकपणावर खुश झालेल्या, आशिष भन्साली यांनी त्या चालकाला 20 हजार रुपये चालकाला बक्षिस म्हणून दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement