एक्स्प्लोर

Pune News : 'राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा'; घोषणा देत आणि काळे झेंडे दाखवून स्वराज्य संघटनेकडून राज्यपालांचा निषेध

स्वराज्य संस्थेच्या वतीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पुण्यात काळे झेंडे दाखवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला.

Pune News : स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांना पुण्यात (Pune) काळे झेंडे दाखवण्यात आले. 'राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. राज्यपाल आज (2 डिसेंबर) पुण्यात दौऱ्यावर आहे. पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. हे सगळे कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न स्वराज्य संस्थेकडून केला जात आहे. 

राजभवन परिसराला छावणीचं स्वरुप
या ठिकाणी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतेही राजभवनाबाहेर जमले आहेत. राज्यपालांना 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक देत इतिहास समजून सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रवादीने सांगितलं आहे. 

धोतरावर सह्या करुन निषेध
दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोतरावर सही करुन, घोषणाबाजी करत राज्यपाल कोश्यारींचा निषेध करण्यात आला होता. स्वराज्य संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. धोतरावर सही करुन अनोख्या पद्धतीने राज्यपालांचा निषेध करण्यात आला. 'राज्यपाल हटवा, स्वाभिमान वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं होतं.

राज्यपाल काय म्हणाले होते?
दीक्षान्त समारंभ सोहळ्यात बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते की, "आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु आवडायचे. त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्हाला जर कोणी विचारलं तुमचे आवडता हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातच ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय," असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असंही कोश्यारी यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: “जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र, समस्याही मांडल्या
“जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र, समस्याही मांडल्या
Pune Crime News: नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget