Pune Bhor Crime news: 'मन सुन्न करणारी अन् माणूसकीला काळीमा', भोर तालुक्यातील घटनेवरून सुप्रिया सुळे संतापल्या; देवेंद्र फडणवीसांना म्हणाल्या...
Pune Bhor Crime news: जेव्हा मुलगी सापडेना तेव्हा शोधाशोध झाली तेव्हा मुलगी जनावरांच्या गोठ्यात मृत अवस्थेत सापडली.

Pune Bhor Crime news: पुण्यातील भोर तालुक्यातून एका चार वर्षीय मुलीवर एका ६५ वर्षांच्या नराधमाने अत्याचार (Rape Case) करुन तिची निर्घृणपणे हत्या केली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे हा प्रकार घडला. ही अल्पवयीन मुलगी नसरापूरला तिच्या आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आली होती. त्यावेळी एका ६५ वर्षांच्या नराधमाने तिला जवळच असलेल्या गुरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार (Sexual Assault) करुन तिची हत्या केली. जेव्हा मुलगी सापडेना तेव्हा शोधाशोध झाली तेव्हा मुलगी जनावरांच्या गोठ्यात मृत अवस्थेत सापडली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संशयित व्यक्तीला पकडले असून पोलिसांनी (Pune Police) त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर काल (शुक्रवार, ता १) रात्री नसरापूर येथील वातावरण तापले होते. (Pune Girl Murder Case) गावकऱ्यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला आहे.
Supriya Sule: मन सुन्न करणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी
सुप्रिया सुळेंनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलंय की, "नसरापूर, ता. भोर येथे एका नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून केला. ही घटना अतिशय संतापजनक, मन सुन्न करणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण गृहखात्याला आदेश देऊन या गुन्ह्याचा जलद तपास करण्याच्या सूचना कराव्या. तसेच हा खटला फास्टट्रॅकवर चालवून गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालिकेला भावपूर्ण श्रद्धांजली.".
नसरापूर, ता. भोर येथे एका नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून केला. ही घटना अतिशय संतापजनक, मन सुन्न करणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण…
— Supriya Sule (@supriya_sule) May 1, 2026
Sushma Andhare on Pune Case: सुषमा अंधारेंची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका
पुणे भोर परिसरात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्याचा अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार, त्याचा निषेध करायलाही शब्द नाहीत. जिथे माणसाचे शब्द थिजतात, जिथे माणूसपण शिल्लक आहे की नाही, आपल्याकडे इतपत परिस्थिती निर्माण होते. आपण राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्यात? खरंच अपेक्षा करण्यासारखी परिस्थिती आहे का? जिथे प्रत्येकजण स्वत:चा ढोल वाजवण्यात मश्गूल आहे, स्वत:ची जाहिरात करुन घेण्यात आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यात व्यस्त आहे, तिकडे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्कील झालंय, हे चार वर्षांचं बाळ सुरक्षित नाही, चार वर्षांच्या लेकराला सुरक्षित सोडलं जात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकूल मागितला जात नाही, मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे, गृहमंत्र्यांना या गोष्टींचा काही फरकच पडत नाही, त्यांना देणेघेणं नाही. काही झालं तरी गृहमंत्री राजीनामा देणार नाहीत. ते दूरच राहिलं, मोठं भाषण करणे, आम्ही प्रकरणाचा मुळाशी जाऊ म्हणणे, या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं, त्याला झळ लागली, आपण एका असुरक्षित राज्यात आहोत, याचं भान आपल्याला असलं पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
Before You Go
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!





















