एक्स्प्लोर

Supriya Sule On Devendra Fadanvis : व्यक्तीचा स्तर जनता ठरवते, अब की बार गोळीबार सरकार; फडणवीसांच्या पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर

खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारणात एखाद्याचा स्तर हा समाज ठरवत असतो., असं म्हणत हे सरकार गोळीबार सरकार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 

पुणे :  लोणावळ्यातील मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar)  आमदार सुनील शेळकेंना (Sunil Shelke) मंचावरुन तंबी दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शरद पवारांनी आपला स्तर पडू देऊ नये, असं भाष्य केलं. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी फडणवीसांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारणात एखाद्याचा स्तर हा समाज ठरवत असतो. समाजातलं आपलं स्थान हे जनता ठरवत असते, असं म्हणत हे सरकार गोळीबार सरकार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 

त्यासोबतच राज्यासह पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यातच अनेक ठिकाणी सलग गोळीबारांचे प्रकार समोर आलं आहे. पुण्यात सगळ्यात जास्त प्रमाणात ड्रग्स सापडले आहेत. त्यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. अब की बार गोळीबार सरकार म्हणत त्यांनी राज्यात सुरु असलेल्या गुन्हेगारी विरोधात काम करण्याची मागणी फडवीसांकडे केली आहे. फडणवीसांनी जर राज्यात चांगलं काम केलं असतं तर गुन्हेगारीवर आणि त्यांच्यावर बोलायची वेळ आली नसती, असं त्या म्हणाल्या. 

अपकी बार गोळीबार सरकार!

राजकारणात एखाद्याचा स्तर हा समाज ठरवत असतो. समाजातलं आपलं स्थान हे जनता ठरवत असते. हर्षवर्धन पाटील राज्याचे नेते आहे. हर्षवर्धन पाटलांना धमक्या भारतीय जनता पक्षाच्या नेच्याकडून धमक्या येत आहे, असं त्या पत्रात लिहिलं आहे. मात्र धमकी द्यायची हिंमत होते, म्हणजेच हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. वरिष्ठ नेते मदन बाफना यांना धमकी दिली जात आहे. त्यामुळे अपकी बार गोळीबार सरकार, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. सत्तेत असलेले आमदार गोळीबार करत आहेत, नेमकं राज्यात चाललंय काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला  आहे. 

गृहखातं अपयशी!

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात ड्रग्स सापडत आहे. करोडोंचं ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केलं आहे. राज्यात असे प्रकार सुरु आहे याला गृहखातं जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं असतं तर आम्हाला फडणवीसांना बोलायची वेळच आली नसती. हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे खोके सरकार आहे, गोळीबार सरकार आहे आणि धमकीबाज सरकार आहे. विरोधकांपासून ते मित्रपक्षांपर्यंत सगळ्यांनाच हे सरकार धमक्या देतात, असे आरोपही फडणवीसांवर केले आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Supriya Sule : वडिलांवरचा आरोप लेकीनं खोडून काढला; आमित शाहांना धन्यावाद म्हणत सुप्रिया सुळेंनी सडेतोड उत्तर दिलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget