Pune Sukanta Ad News: काय थाळी, काय बेत, काय चव... एकदम ओक्केमध्ये; पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलची हटके स्टाईल जाहिरात
आमदार शहाजी बापू पाटलांच्या डायलॉगचा जाहिरातीसाठी वापर केला आहे. काय झाडी, काय डोंगर काय हाटील एकदम ओक्केमध्ये... असा त्यांचा डायलॉग होता. त्यांचंच अनुकरण करत सुकांता हॉटेलनी काय थाळी, काय बेत, काय चव... एकदम ओक्केमध्ये आहे सगळं अशी जाहिरात केली आहे.
Pune Sukanta Ad News: पुण्यात खवय्यांची काही कमी नाही. मात्र याच हॉटेल्सच्या जाहिराती देखील हटके करण्यासाठी पुण्य़ातील व्यवसायिक विशेष मेहनत घेतात. ट्रेन्ड काय सुरु आहे? लोकांना काय आवडेल? याचा विचार करुन अनेक मोठे हॉटेल व्यवसायिक जाहिराती करत असतात. पुण्यात थाळी जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या सुकांता हॉटेलची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. कारण त्यांनी थेट सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांच्या डायलॉगचा जाहिरातीसाठी वापर केला आहे. काय झाडी, काय डोंगर काय हाटील एकदम ओक्केमध्ये... असा त्यांचा डायलॉग होता. त्यांचंच अनुकरण करत सुकांता हॉटेलनी काय थाळी, काय बेत, काय चव... एकदम ओक्केमध्ये आहे सगळं अशी जाहिरात केली आहे.
सुकांता हॉटेल हे पुण्यातील डेक्कन परिसरातील थाळीसाठी प्रसिद्ध असलेलं हॉटेल आहे. सोमवार -मंगळवार असूद्या नाही तर शनिवार-रविवार या ठिकाणी खवय्यांची तुफान गर्दी असते. अनेकांचा वीकेंड प्लॅनच सुकांता थाळी खाण्याचा असतो. त्यामुळे दरवेळी वेगळ्या पद्धतीने सुकांताचे सगळे लोक वेगळं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतात. यावेळी मात्र त्यांच्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे.
सध्या सगळीकडे सत्तानाट्य बघायला मिळत आहे. राजकारणात बॅनरबाजी केली नाही असं कोणत्याच निवडणुकीच्या वेळी होत नाही. अनेक राजकीय फटकेबाजी असणारे बॅनर पुण्यात लागले होते. विरोधी पक्षाने काही बॅनर्स फाडले. मात्र काही बॅनर पाहून पुणेकर मजा लुटताना दिसत आहे. पुणेकर, पुणेकरांच्या कल्पना, त्यांचा रोखठोकपणा, पुणेरी पाट्या यांच्यात या सुकांताच्या बॅनरने पून्हा एकदा भर पडली आहे.
महानगरपालिकेकडून 1000 हून अधिक फ्लेक्स हटवले
राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई केली होती. या मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातून 1000 पेक्षा जास्त फ्लेक्स आणि बॅनर हटवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काही ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. एकनाथ शिंदेयांच्या पक्षासोबत गेलेल्या आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड केली जात आहे. अशा स्थितीत सर्वत्र तणावाचे वातावरण होते.