पुण्यात कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या
पुण्यातील कोंढवा परिसरातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये हा प्रकार घडला आहे. गुंडाप्पा शेवरे (वय 60) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
पुणे : पुण्यातील कोढंवाड येथील एका कोविड केअर सेंटरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 60 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये हा प्रकार घडला आहे. गुंडाप्पा शेवरे (वय 60) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडाप्पा शेवरे आणि त्यांचा मुलगा कोरोनाबाधित आढळल्याने 4 जुलैपासून त्यांना कोंढव्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या दोघांना ज्या खोलीत ठेवण्यात आले होते त्या खोलीत आणखी दोघेजण उपचार घेत होते.
दरम्यान आज सकाळी शेवरे यांचा मुलगा आणि अन्य दोघेजण नाश्ता करण्यासाठी बाहेर पडले. नाश्ता करून ते परत आले असता त्यांना गुंडाप्पा शेवरे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट नाही झाले. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
इतर बातम्या
- राज्यात हॉटेल्स आणि लॉजेस परवापासून सुरू होणार, रेस्टॉरंट्सना अद्याप परवानगी नाही
- लसींच्या मानवी चाचण्यांना परवानगी म्हणजे कोरोनाच्या शेवटाची सुरुवात : केंद्र सरकार
Devendra Fadnavis Thane | टेस्टिंगची क्षमता राज्यात जास्त, त्याचा वापर झाला पाहिजे - देवेंद्र फडणवीस