एक्स्प्लोर
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दीड वर्षाचा मुलगा गंभीर जखमी
भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं एका दीड वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पुण्यातल्या चंदननगर परिसरातल्या खराडीमध्ये बुधवारी ही घटना घडली.

फाईल फोटो
पुणे : भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं एका दीड वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पुण्यातल्या चंदननगर परिसरातल्या खराडीमध्ये बुधवारी ही घटना घडली. मनित गाडेकर असं जखमी मुलाचं नाव असून, तो मित्रांसोबत घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी अचानक येऊन कुत्र्याने त्याच्या चेहऱ्याचा चावा घेतला. यावेळी आईने त्याला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले. मात्र, तोपर्यंत त्याच्या चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात कुत्र्याने चावा घेतला होता. या कुत्र्याच्या हल्ल्यात लहानग्याच्या डोळ्याची पापणी फाटली आणि डोळा बाहेर आला होता. काल संध्याकाळी या मुलाच्या डोळ्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, खराडी परिसरात भटक्या कुत्र्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महापालिकेकडून या कुत्र्यांना आवरण्याची मागणी होत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
पुणे























