एक्स्प्लोर
Advertisement
वंचितांना खास दिवाळीभेट! 'ग्रीन सिग्नल'मुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य
पुणे : पारधी वस्तीत दिवाळी सण तसा तितक्या उत्साहाने साजरा केला जात नाही. याला अनेक कारणं आहेत. समाजापासून कायम वंचित आणि मुख्य प्रवाहापासून कायम दुर्लक्षित राहिल्याने तथाकथित पुढारलेल्या समाजापासून तुटलेला हा समाज. त्यात निशिबी बहिष्कृताचं जगणं. मात्र, यंदा दिवाळीच्या निमित्ताने या वस्तीतल्या लोकांची लगबग, चिमुकल्यांचा किलबिलाट आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकप्रकारचा आनंद पाहायला मिळाला. या सर्वांना कारण ठरली 'ग्रीन सिग्नल शाळा'.
दिवाळीत फराळ, नवे कपडे, फटाके इत्यादींपासून हा समाज तसा दूरच. मात्र, त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहोचवायचं, अशी कल्पना 'स्नेहग्राम'चे महेश निंबाळकर यांना सूचली आणि त्यांनी ती कल्पना किर्ती ओसवाल यांना बोलून दाखवली.
विशेष म्हणजे, महेश निंबाळकर यांनी ज्यावेळी वंचितांच्या वस्तीत दिवाळी साजरी करण्याची कल्पना किर्ती ओसवाल यांच्याकडे बोलून दाखवली, त्यावेळी किर्ती यांनी त्यांची पत्नी अंजली यांच्याकडे याबाबत विचार मांडला. त्यानंतर अंजली ओसवाल यांनी अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला. तो म्हणजे, स्वत:चा वाढदिवस साजरा न करता, त्याच रकमेतून वंचितांची दिवाळी 'गोड' करायची. या सर्व गोष्टींमुळे महेश निंबाळकरांच्या कल्पनेला आणखी बळ मिळालं.
मग काय.... क्षणाचाही विलंब न करता कोणत्याही अपेक्षेविना काम करणारे हे समाजसेवी हात कामाला लागले.
यावेळी सुमारे 88 मुलांना कपडे, 150 फराळ किट, 50 महिलांना साड्या, मुलांना फटाके, चॉकलेट्स, दिव्यांची आरास, रांगोळीतील रंग अन् फुलांचा वर्षाव... इथल्या प्रत्येक चिमुकल्याच्या, प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं आनंद दिसत होता. इथली पोरं बेभान होऊन आनंद लुटत होते.
या उपक्रमाबाबत महेश निंबाळकरांनी अत्यंत समर्पक शब्दात भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "पाषाणालाही हर्षाचा बांध फुटावा, इतकं प्रसन्न वातावरण उपक्रमादरम्यान इथे होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नवी उमेद दिसत होती. एकंदरीत 'ग्रीन सिग्नल शाळे'ची दिवाळी गोड झाली."
"किर्ती ओसवाल यांच्यासारखी माणसं आणि ग्रीन सिग्नल शाळेची टीम, अजित फाऊंडेशन, टीम रोशनी यांसारख्या संस्था, असे सारे दिखाव्याची दिवाळी टाळत 'प्रकाशमय' दिवाळी करणारे सोबतीला असल्यामुळेच वंचितांसाठी अनोखी दिवाळी साजरा करता आली.", अशा भावनाही महेश निंबाळकरांनी व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement