Sky Dining : हे काय जबरदस्त हाटेलय!... 120 फुटांवर, 360 डिग्री नजारा; थरार अनुभवत घ्या जेवणाचा आस्वाद
आज आम्ही तुम्हाला एक अशा हॉटेलबद्दल सांगणार आहोत. जे महाराष्ट्रात तुम्ही कुठं पाहिलं ही नसेल, अनुभवलं ही नसेल. पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी लगतच्या कासारसाई धरणावर हे हॉटेल आहे.
Sky Dining : आपण अनेक प्रकारचे हॉटेल्स पाहतो. कुठं बुलेट थाळी तर कुठे वेगवेगळ्या स्किमा असतात. पुणेकर यात आघाडीवर असतातच. मात्र थरार अनुभवत तुम्ही कधी जेवणाचा आस्वाद घेतलाय का? आता तुम्ही म्हणाल की एकतर हा प्रश्नच चुकीचा आहे. अन् असं कोणी वेडं धाडस केलं असेल तर तो स्वतःच्या जीवावर उदार झाला असेल. पण आम्ही म्हटलं की हे तुम्ही ही अनुभवू शकता ते ही सुरक्षितरीत्या.
तुम्ही बऱ्याच ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतला असेल. खानावळ, ढाबा, साधे हॉटेल, अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये ही तुम्ही गेलेला असाल. परंतु आज आम्ही तुम्हाला एक अशा हॉटेलबद्दल सांगणार आहोत. जे महाराष्ट्रात तुम्ही कुठं पाहिलं ही नसेल, अनुभवलं ही नसेल. पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी लगतच्या कासारसाई धरणावर हे हॉटेल आहे.
हॉटेलमध्ये गेल्यावर खुर्चीवर खवय्ये बसलेले दिसतात पण खवय्यांना सीट बेल्ट लावला जातो. हॉटेलमध्ये आलेत, खुर्चीवर बसलेत मग सीटबेल्ट कशासाठी? याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या काही सेकंदात मिळतं. कारण तुम्ही बसलेली खुर्ची आणि टेबल थेट 120 फूट उंचीवर पोहोचतो अन् मग दिसतो 360 डिग्री हा व्ह्यू आहे. या हॉटेलला स्काय डायनिंग असं म्हटलं जातं.
पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी लगतच्या कासारसाई धरणावर हा नजारा तुम्ही पाहू शकता. अतिशय विहंगम आणि नयनरम्य असं हे दृश्य आणि याच वातावरणात अनेक खवय्ये रोज पोहोचतात.
महाराष्ट्रात असं हॉटेल तुम्हाला कुठं पाहता येणार नाही, अनुभवता येणार नाही. हे आम्ही का म्हणत होतो, हे तुम्हाला इथं गेल्यानंतर नक्कीच लक्षात येईल.
हे देखील वाचा