एक्स्प्लोर

निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा : संजय राऊत

ठाकरे सरकार कोसळेल यासाठी पैजा लागल्या होत्या. सरकार पूर्णपणे ताकदीने चालणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हे सरकार पडेल असं दिल्लीतील कोणी म्हणत नाही, हे स्वबळावरच सरकार आहे, असंही ते म्हणाले. ते आज पुण्यात बोलत होते.

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याची टीका केलीय. बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार राऊत यांनी ही टीका केली आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाकडून बिहार मधील नागरिकांना मोफत लस देण्याचे आश्वासन देण्यात आले. भाजपच्या या आश्वासनाच्या विरोधात विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती आणि भाजप वर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आणि भारतीय जनता पक्षाने दिलेले मोफत आश्वासन हे आयडियल कोड ऑफ कण्डक्टचे उल्लंघन नसल्याचं म्हटलं. यावरती प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याचं म्हटलंय.

काँग्रेसच्या मजबूत पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार उभा

खासदार संजय राऊत हे पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापासाठी पुण्यात आले होते. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे स्थिर असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचं वक्तव्य परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आहे. त्याबद्दल खासदार संजय राऊत यांना विचारलं असता नांदेड महापालिकेचा विषय असेल तर स्वतः मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालतील असं म्हटलं आणि काँग्रेसच्या मजबूत पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार उभा असल्याचं सांगितलं.

त्याच बरोबर बारा विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारांची यादी कोणती आहे याबद्दलही संजय राऊत यांना विचारला असता माध्यमांमधूनच वेगवेगळ्या नावांची चर्चा होत असल्याचं आणि प्रत्येक न्यूज चॅनेलकडून एक वेगळी यादी दाखवली जात असल्याचं म्हटलं. ऊर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेने ऑफर दिली आहे का याबद्दल स्पष्ट बोलण्याचं संजय राऊत यांनी टाळलं, मात्र मुख्यमंत्री जर कोणाशी बोलणं करत असतील तर ती बाब गुप्त राहते, त्याची अशी सार्वजनिक चर्चा होत नाही असं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर शिवसेनेमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या शिवसैनिकांना बाजूला ठेवून नव्याने पक्षात आलेल्यांना संधी मिळत असल्याबद्दल ही संजय राऊत यांना पत्रकारांनी छेडलं. प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत तर आता उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी घेतले जातंय. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री असलेले शंकरराव गडाख हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत तर दुसरे मंत्री राजेंद्र यड्रावकर हे देखील अपक्ष म्हणून निवडून आले आहेत या दोन अपक्षांना अनुक्रमे अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा पाया भक्कम करण्यासाठी मंत्रीपद देण्यात आले. सत्ता महत्त्वाची असते आणि त्यासाठी अशा लोकांना पक्षात सामावून घ्यावं लागतं असं संजय राऊत म्हणाले. या दोघांनाही निवडून येण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता असंही त्यांनी सांगितलं मूळ शिवसैनिक आणि नवीन शिवसैनिक असं काही नाही सगळे शिवसैनिकच आहे असेही संजय राऊत यांनी म्हटलंय.

शरद पवार प्रेम करावे असेच व्यक्तिमत्त्व शरद पवार सरकार चालवतात या चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांवर बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार हे आजच्या घडीला देशातील प्रमुख, अनुभवी आणि संयमी नेते आहेत. शरद पवारांनी सरकारला सल्ला दिला तर पोटात काय दुखतं? असा सवाल त्यांनी केला. शरद पवार प्रेम करावे असेच व्यक्तीमत्त्व आहे, असंही ते म्हणाले.

आरक्षणाच्या वादावर मोदींनी लक्ष घालायला हवं असंही ते म्हणाले. दोन्ही राजांनी पुढाकार घेऊन पंतप्रधान मोदींच्या दरबारात विषय न्यावा, आम्हीही पाठिंबा देऊ, असं ते म्हणाले.

राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही. राजभवन ही घटनात्मक जागा, त्याची प्रतिष्ठा राखली जावी. राज्यपालांनी पवार यांच्याकडे पाठवण्याऐवजी पंतप्रधानांकडे पाठवावे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget