एक्स्प्लोर

Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक (Shivajirao Bhosle Cooperative Bank Fraud प्रकरणी मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे.

Mangaldas Bandal: पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक (Shivajirao Bhosle Cooperative Bank Fraud प्रकरणी मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. यु. कदम यांन याबाबतचे निर्देश दिले आहेत. पुण्यावरुन बांदल यांना अटक करण्यात आली होती. 

दरम्यान, मंगलदास बांदल यांच्या घरांवर ईडीच्या धाडी सुरु होत्या. या धाडीत कोट्यावधी रुपयांची रोकड सापडल्याची माहिती मिळाली आहे. मंगलदास बांदल यांना मुंबई सत्र न्यायालयात विशेष पीएमएलए कोर्टात आज हजर करण्यात आलं होतं. बांदल यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा तर ईडीतर्फे सुनील गोन्साल्विस यांनी केला युक्तिवाद केला.

नेमकं प्रकरण काय?

पुणे जिल्हा परिषद माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी काल (मंगळवारी) ईडीने कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती असलेल्या बांदल (यांच्या पुण्यातील महम्मदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील निवासस्थानांवर ईडीच्या पथकाने मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेसहाच्या सुमारास एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी 5 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. त्यानंतर मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान चार वेळा नोटीस आलेले आणि आता ईडीने कारवाई केलेले मंगलदास बांदल चांगलेच चर्चेत आले आहेत.

बांदल जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आले होते

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना 26 मे 2021 रोजी शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणानंतर त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यामुळे बांदल तब्बल वीस महिने तुरुंगात होते. बांदल यांना लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ते जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आले होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ईडीची कारवाई झाल्यानं चर्चांना उधाण

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप मेळाव्याला बांदल यांनी हजेरी लावल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.अशातच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल किंवा त्यांच्या पत्नी रेखा बांदल या शिरूर-हवेलीमधून तयारी करीत असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर बांदल यांच्यावर 'ईडी'ची छापेमारी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी: मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींचं घबाड सापडलं, 16 तास संपत्तीची मोजदाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget