एक्स्प्लोर

Pune : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर आता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

पुण्यातील वाबळेवाडीतील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे निलंबन काही दिवसांपूर्वी मागे घेण्यात आले होते.

Pune News : पुण्यातील वाबळेवाडीतील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावरील निलंबन सहा महिन्यांच्या चौकशीनंतर काही दिवसांपूर्वींच मागे घेण्यात आले होते. ज्यानंतर आता त्यांची शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वारे यांच्यावर शाळेत अॅडमिशन देण्यासाठी पालकांकडून पैसै घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यानंतर त्यांना पुणे जिल्हा परिषदेकडून निलंबित करण्यात आलं होतं. पण सहा महिने चौकशी झाल्यानंतर काही दिवासांपूर्वीच त्यांच्यावरील निलंबन मागे घेण्यात आले. ज्यानंतर आता शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम पाहणार आहेत.

Pune : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर आता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

काही दिवसांपूर्वी वारे यांच्यासह 20 कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. यामध्ये काही विस्तार अधिकारी, काही शिक्षक आणि काही अभियंत्यांचा समावेश होता. दरम्यान त्यांची विभागीय चौकशी सुरुच राहणार असल्याचं यावेळी कळवण्यात आलं होतं.  पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करणाऱ्या दत्तात्रय वारे यांनी अभिनव संकल्पना राबवून ही शाळा नावारूपास आणली. मात्र त्यानंतर शाळेत देण्यासाठी पालकांकडून पैसै घेतले जात असल्याचा आरोप दत्तात्रय वारे आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या गावातील लोकांवर करण्यात आला. प्राथमिक चौकशीत दत्तात्रय वारे यांच्या बॅक अकाउंटमधे पैशांची देवाणघेवाण दिसून आल्यानंतर दत्तात्रय वारेंना निलंबित करण्यात आले होते.

...आणि वाबळेवाडीत आदर्श शाळा उभी राहिली

2012 मध्ये वाबळेवाडीतील शाळेत शिक्षक म्हणून रुजु झाल्यावर दत्तात्रय वारे यांनी लोकसहभागातून शाळेचा विकास करण्यास सुरुवात केली. पुढे 2016 साली त्यांचे काम पाहून आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बॅक ऑफ न्यूयॉर्कने शाळेसाठी निधी दिला आणि वाबळेवाडीत आदर्श शाळा उभी राहिली. या शाळेत फळा किंवा बाकडे न ठेवता विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षण देण्यावर भर देण्यात आला. यामुळे खाजगी शाळांमधे शिकणारे विद्यार्थीही वाबळेवाडीतील या शाळेकडे वळले. वारे सरांच्या या कामाची दखल सर्वत्र घेण्यात आली आणि वाबळेवाडीतील शाळेसारख्या शाळा राज्यभरात उभारण्याची गरज अजित पवारांनी बोलून दाखवली होती. फक्त 34 पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील संख्या 9 वर्षात दत्तात्रय वारे यांनी 531 पर्यंत पोहचवली होती. या शाळेसाठी गावकऱ्यांनी कोट्यवधींच्या जमिनीही दिल्या. वाबळेवाडीमधील या शाळेतील उपक्रम प्रेरणादायी आहेत. इथं आठ वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी सहावीपासून केली जाते. भविष्यातील व्यवसाय कोणते असतील याचा परिचय, कोडिंग व प्रोग्रामिंग , इंग्रजी संभाषण असे कितीतरी उपक्रम या शाळेत रावबले जातात. आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षण प्रेमींनी या शाळेला भेट दिली आहे. या शाळेतील विविध भाषा शिक्षणाचे उपक्रम हे अनुकरणीय असून अनेक शाळा त्यांच्या प्रभावातून काम करत आहेत.  

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Embed widget