एक्स्प्लोर

Shetkari Sanghatana : ओतूरला आज कांदा आणि ऊस परिषद, शेतकरी संघटना आक्रमक, 'या' आहेत प्रमुख मागण्या 

शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कांदा आणि ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर (Otur) या ठिकाणी ही परिषद होणार आहे.

Shetkari Sanghatana : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरुन शेतकरी संघटना (Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिवशीच (2 ऑक्टोबर) शेतकरी संघटनेच्या वतीनं कांदा आणि ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर (Otur) या ठिकाणी ही परिषद होणार आहे. या परिषदेला शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील (Raghunath Dada Patil ) हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजता या परिषदेला सुरुवात दोणार आहे.

नेमक्या काय आहेत मागण्या?

  • कांद्यावरील निर्यातबंदी कायमची उठवली पाहिजे
  • स्वामिनाथन आयोगाप्रमाणं कांद्याला 30 रुपये भाव मिळाला पाहिजे
  • दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतराची अट रद्द झाली पाहिजे
  • सी. रंगरंजन समिती प्रमाणं शेतकऱ्यांना 70/30 टक्के प्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळावेत
  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होऊन 7/12 कोरा झाला पाहिजे
  • जुन्नर तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर झाला पाहिजे

या प्रमुख मागण्यांसाठी आज ओतूरला कांदा आणि  ऊस परिषद आयोजीत करण्यात आली आहे. या परिषदेला मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे. जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांसमोर विविध अडचणी

सध्या राज्यातील शेतकरी विविध अडचणींचा सामना करत आहे. शेतकऱ्यांना कायमच तोटा सहन करावा लागत आहे. उत्पादन खर्च आणि मिळणारं उत्पन्न याचा मेळ बसत नाही, त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. उत्पादन खर्च वाढत असताना शेत मालाला मिळणार दर मात्र, त्या पटीत वाढत नाही, त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढत असल्याचे शेतकरी संघटेनं म्हटलं आहे. 

दरम्यान, यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं काही ठिकाणी वाहून गेली आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. मोठं नुकसान झालं आहे. तसेच अतिवृष्टीनंतर काही भागात कापूस आणि सोयाबीन पिकांवर रोगांचा देखील प्रादुर्भाव होताना दिसत आहे. अशा विविध संकटाचा सामना सध्या शेतकरी करत आहेत. त्यामुळं या शेती प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊस आणि कांदा परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Soybean News : बाजारात आवक नसताना सोयाबीनच्या दरात घसरण, शेतकऱ्यांसह व्यापारी चिंतेत 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget