एक्स्प्लोर

Soybean News : बाजारात आवक नसताना सोयाबीनच्या दरात घसरण, शेतकऱ्यांसह व्यापारी चिंतेत 

बाजारात आवक नाही तरीही सोयाबीनच्या भावात घसरण होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापारी चिंतेत आहेत.

Soybean News : सोयाबीनच्या (Soybean) दरात रोज घसरण होत चालली आहे. बाजारात आवक नाही तरीही भावात घसरण होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापारी चिंतेत आहेत. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलांचे भाव पडत आहेत. त्यातच केंद्र सरकारनं खाद्यतेल आयातीचे धोरण स्वीकारले आहे. याचा एकत्रित फटका सोयाबीनच्या दरावर होत असून, दरामध्ये रोजच घसरण होत चालली आहे. यामुळं शेतकऱ्यांसह व्यापारी देखील चिंतेत आहेत. 

सध्या सोयाबीनला  4 हजार 900 रुपयांचा दर

सध्या जागतिक बाजारपेठेत खाद्य तेलांच भाव पडत आहेत. त्यातच केंद्र सरकारनं खाद्य तेल आयातीचं धोरण स्वीकारलं आहे. याचा एकत्रित फटका सोयाबीनच्या दरावर होत आहे.  बाजारात आवक नाही तरीही भावात घसरण होत आहे. त्यामुळं व्यापारी आणि शेतकरी चिंतेत आहेत. जागतिक बाजारपेठेत खाद्य तेलांचे भाव पडत आहेत. दरम्यान, लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही उच्चतम आहे. दरवर्षी दसऱ्याच्या तोंडावर बाजारात शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक असते. शेतकऱ्यांची धावपळ असते. व्यापारी अडते खरेदीदार यांची लगबग असते. मात्र, यावर्षी बाजारात अक्षरशः मरणकळा पसरली आहे. सर्वत्र शुकशुकाट आहे. दरवर्षी या वेळेला किमान 25 हजार कट्टे सोयाबीन आणि तेवढेच मूग उडीद आणि इतर शेतमाल बाजारात दाखल होत असतो. यावर्षी बाजारामध्ये दोन ते तीन दिवसापासून रोज सात ते आठ हजार कट्टे सोयाबीन आलेला आहे. सध्या आवक कमी जरी असली तरी सोयाबीनच्या बाजारभावात उठाव मात्र दिसून येत नाही. 4 हजार 900 रुपयांचा दर सोयाबीनला मिळत आहे. मागील पाच ते सहा दिवसापासून दरामध्ये घसरण सुरूच आहे.

केंद्र सरकारचे खाद्यतेल आयातीचे धोरण ही सोयाबीनच्या दराला मारक

जागतिक बाजारपेठेत पाम तेलाच्या दरात सतत घसरण सुरु असल्याने देशी खाद्य तेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. केंद्र सरकारचे खाद्यतेल आयातीचे धोरण ही सोयाबीनच्या दराला मारक ठरत आहे. गतवर्षी सोयाबीनचा दर उच्चांकी झाला होता. तो दर पुन्हा मिळेल या अपेक्षेमुळे गेल्या वर्षीपासून ज्या शेतकऱ्यांची होल्डिंग कॅपॅसिटी आहे, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन स्टॉक करून ठेवला आहे. ते अद्याप बाजारात आलं नाही. ते सोयाबीन जवळपास 30 टक्के आहे. सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्याने ते सोयाबीन मोठ्या प्रमाणात सध्या बाजारात येत आहे. लातूरच्या बाजारात जुनी सोयाबीन जवळपास 7000 कट्टे रोज येत आहे.

Soybean News :  बाजारात आवक नसताना सोयाबीनच्या दरात घसरण, शेतकऱ्यांसह व्यापारी चिंतेत 

कर्नाटकचे सोयाबीन लातूरच्या बाजारात

अद्याप नवीन सोयाबीनची काढणी सुरु नसल्याने बाजारात सोयाबीन येण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे दररोज दोन हजार कट्याच्या आसपास नवीन सोयाबीन येत आहे ते कर्नाटक आणि इतर राज्यातून येत आहे. दरम्यान, दर कमी असल्यामुळं शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदार चिंतेत आहे. कारण आत्ता सोयाबीन कोणत्या भावाने खरेदी करायचं. पुढे कोणत्या भावाने विकायचं पंधरा दिवसानंतर ज्यावेळेस सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरु होईल, त्यावेळेस सोयाबीनचा नेमका दर काय असेल. अशा अनेक शंका-कुशंका सध्या व्यापारी आणि खरेदीदार यांच्या मनामध्ये आहेत.

परतीच्या पावसाचाही सोयाबीनला जोरदार फटका

सोयाबीनच्या बाजारभावातील चढ उतारामुळं शेतकरी भरडला जात आहे. सोयाबीन लागवडीपासूनच सततचा पाऊस ,शंखी गोगलगाय, रोगराई या सर्व समस्यांनी पाठ सोडली नव्हती. ज्या ठिकाणी सोयाबीन तग धरुन आहेत, त्या सोयाबीनला आता परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसत आहे. ज्यात शेंगा भरलेल्या आहेत, त्याला सततच्या पावसाचा फटका बसत आहे. एकरी पंचवीस हजार ते तीस हजार रुपयांचा खर्च सोयाबीन लागवडीपासून काढणीपर्यंत येत आहे. बाजार भाव जर योग्य नसेल तर काढणीलासुद्धा सोयाबीन पुरणार नाही. या मानसिकतेत शेतकरी आला आहे. आवक सुरु झाली तर सोयाबीनचे दर यापेक्षाही खाली जातील, यामुळं शेतकऱ्यांना नेमकं काय करावं ही चिंता सतावत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्याला मिळाली 98 कोटी 58 लाखांची मदत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेत सभा घ्यावी- संदीप देशपांडेABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 November 2024Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Embed widget