एक्स्प्लोर
...तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन : शरद पवार
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा हवामान खात्याला चिमटा
बारामती : येत्या चार दिवसात चांगला पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा कालचा अंदाज खरा ठरल्यास त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन, असा चिमटा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढला. ते बारामतीत बोलत होते.
“मान्सून लांबला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलंय. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ लोकांनी काल सांगितले की, येत्या चार दिवसा म. महाराष्ट्र, प. महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पडेल. त्यांचा हा अंदाज खरा ठरल्यास त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन.”, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, माझं कर्ज माफ झाले, असं कुठल्या शेतकऱ्याने बँकेला पत्र दिलंय, असं चित्र दिसलं नाही, असे म्हणत शरद पवारांनी कर्जमाफीवर असमाधानी असल्याचे सांगितले.
जागतिक मधमाशी दिवस व कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्य वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज शरद पवार बारामतीत आले होते. यावेळी मधूसंदेश प्रकल्पाअंतर्गत उत्कृष्ट शेतकऱ्यांना पवारांच्या हस्ते पुरस्कारही देणात आले.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement