एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही : शरद पवार
पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नसली, तरी सरकारच्या या पहिल्या पावलाचं स्वागत केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. आज पुण्यात वार्ताहर संमेलनात ते पत्रकारांशी बोलत होते.
कोणत्याच मागण्या एकाचवेळी पूर्ण होत नसता, त्यामुळे उर्वरित मागण्यांसाठी आम्ही भविष्यात आग्रह धरु असे सूचक विधानही त्यांनी केलं. शिवाय कर्जमाफी हे एक पाऊल होतं. आता यापुढे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार असल्याचं, त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
शिवाय ग्रामीण सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे दोन हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा आहे. त्यामुळे त्या जमा करुन घेण्यासठी राज्य सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर कर्जमाफीची मर्यादा ही एक लाखावरून दीड लाखांवर नेली होती. त्यामुळे राज्यातल्या 40 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा दावा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांच्या मनात खदखद
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, असं वक्तव्यं केलं होतं. पवारांच्या या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यासंदर्भात त्यांना विचारले असता, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगून त्याला ऐतिहासिक आधार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते. त्याला ऐतिहासिक आधार आहे. अफझलखान हा शिवरायांनी मुस्लीम होता, म्हणून नाही तर स्वराज्याचा, रयतेच्या राज्याचा शत्रू होता म्हणून मारला. छत्रपती शिवरायांनी कधी जात, धर्माचा विचार केला नाही. अफझलखानाला जसा मारला. तसाच कृष्णाजी भास्कर यालाही मारला. स्त्रियांबाबत गैरवर्तन करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडले. बजाजी निंबाळकर ,जावलीचे मोरे अशा कित्येकांवर शस्त्र चालवली. त्यामुळे माझ्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांच्या मनात किती खदखद आहे हे यातून दिसून येतं.'' संबंधित बातम्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी PHOTO : 34 हजार कोटींची कर्जमाफी... छत्रपती शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते: शरद पवारअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement