एक्स्प्लोर
पुण्याच्या ऐतिहासिक शनिवार वाड्याला 285 वर्षे पूर्ण
पुणे: मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक वस्तूला 285 वर्षे पूर्ण झाली आहेत.22 जानेवारी 1732 रोजी पूर्ण झालेल्या शनिवार वाडय़ाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला 16 हजार 120 रुपये खर्च आला होता.
पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी माघ शुद्ध तृतीया, या तिथीला (शके 1651) म्हणजेच 10 जानेवारी 1730 रोजी भूमिपूजन करून शनिवार वाडय़ाच्या बांधकामाचा प्रारंभ केला. त्या दिवशी शनिवार होता. पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण होऊन 22 जानेवारी 1732 रोजी वाडय़ाची वास्तुशांत झाली, त्या दिवशीही शनिवार होता.
वास्तुशांतीला 233 रुपये आठ आणे खर्च आला होता. तीनशे वैदिकांनी वास्तुशांतीचे धार्मिक विधी केले. हा वाडा शनिवार पेठेमध्ये असल्याने त्याचे नाव शनिवार वाडा असे ठेवले गेले असा इतिहास सांगण्यात येतो.
आज शनिवार वाड्याला 285 वर्षांचा प्रदीर्घ काळ पुर्ण झाल्याने संपूर्ण वाड्याची फुलांनी सजावट करण्यात आली होती. तसेच यावेळी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
संबंधित बातम्या
'बाजीराव मस्तानी'मुळे शनिवारवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement