Pune Crime news : मित्रानेच केला घात! नराधमाने घरी बोलवून कोल्ड्रिंकमधून दिलं गुंगीचं औषध अन् मग...
पुण्यात गुन्हेगारीचे आणि अत्याचाराच्या प्रमाणात सातत्याने वाढ झाली आहे. कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Pune Crime news : पुण्यात गुन्हेगारीचे आणि (Pune crime) अत्याचाराचं प्रमाणात सातत्याने वाढ झाली आहे. एका नराधमाने कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध टाकून त्याच्या मैत्रिणीवरच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार (rape) समोर आला आहे. याप्रकरणी सातारा येथील एका 23 वर्षाच्या तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी अभिमन्यू दिलीप शेरेकर, उदयन दिलीप शेरेकर, दिलीप शेरेकर, प्रशांत कोली, कपील, सागर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार पुण्यातील धनकवडी परिसरात घडला आहे. ओळखीचा फायदा घेत कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला आहे. त्याचे व्हिडीओ काढून ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्यानंतर वारंवार तिच्यावर बलात्कार केला. तिला जबरदस्तीने लग्न करायला लावून तिच्या आई-वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार 18 ऑगस्ट 2019 ते 28 ऑक्टोबर 2022 दरम्यान घडला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मित्रानेच केला घात
तक्रारदार अभिमन्यू शेरेकर यांची मैत्री होती. मैत्री असल्याने त्यांनी मुलीला घरी बोलवून घेतलं होतं. त्या ठिकाणी ती आल्यावर तिला गुंगीचं औषध दिलं. औषध प्यायल्यावर तिला गुंगी आली आणि त्या नराधम मित्राने तिच्यावर बलात्कार केला. तायच दरम्यान तिचे फोटोही काढून घेतले. त्यानंतर 5 एप्रिल 2022 रोजी अभिमन्यू त्याचा मित्र प्रशांत कोली आणि कारचालक यांनी तिला ठाण्याला नेले. तेथे त्यांनी मुलीचं जबरदस्तीने अभिमन्यू याच्याबरोबर लग्न लावून दिलं. त्यानंतर मुलीने ते फोटो आणि व्हिडीओ डिलिट करण्याबाबत विचारणा केली असता अभिमन्यूचा भाऊ दयन शेरेकर आणि वडील दिलीप शेरेकर यांनी तक्रारदार मुलीला यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
बलात्काराच्या घटनेत वाढ
यापूर्वीदेखील असाच प्रकार पुण्यात समोर आला होता. एका 33 वर्षीय महिलेला तरुणाने कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध देत तिच्यावर बलात्कार केला होता. बलात्कार करतानाचा व्हिडीओदेखील त्या व्यक्तीने काढला होता. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यासोबतच फ्लॅट विक्रीचा बहाणा करुन 34 लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर आरोपीने मानसिक छळही केला होता. या त्रासाला कंटाळून महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली होती. या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला होता. ही घटना 2017 ते 2019 यादरम्यान घडली होती. बदनामीच्या भितीने महिलेने याबाबत उशिरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.