एक्स्प्लोर

Sextortion case: सेक्सटॉर्शनमधून होताहेत आत्महत्या, पुण्यात आठवडाभरात दोन बळी; जाणून घ्या आहे तरी काय?

सोशल मीडियाच्या माध्यमातून नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणं किंवा फोटो मॉर्फिंग करणं. मात्र यात नग्न व्हिडीओ काढून जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणं हाच महत्त्वाचा आणि गंभीर सेक्सटॉर्शनचा प्रकार आहे. 

पुणे : पुण्यात रोज अनेक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल होतात. मात्र मागील दोन दिवसात सेक्सटॉर्शनने दोन तरुणांनी टोकाचे पाऊस उचलले आहे. नग्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास  सोशल मीडियावर नग्न व्हिडीओ सेकंदात व्हायरल होतील, अशा शब्दांमध्ये मेसेज केले. या सगळ्या धमक्यांना घाबरुन पुण्यतील  दोघांनीही टोकाचं पाऊल उचललं. पुण्यातच नाही तर नागपूरचे डॉक्टर सेक्सटॉर्शनला बळी पडले. वाढत असलेल्या या गुन्ह्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे. 

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय?

सायबर पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत करणारे आणि डिजिटल टास्क फोर्सचे संस्थापक रोहन न्यायाधीश सांगतात, सेक्सटॉर्शनचे दोन प्रकार आहे. पहिला प्रकार म्हणजे लोक अॅपच्या माध्यामातून खंडणीची मागणी करणं आणि दुसरा प्रकार म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणं किंवा फोटो मॉर्फिंग करणं. मात्र यात नग्न व्हिडीओ काढून जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणं हाच महत्त्वाचा आणि गंभीर सेक्सटॉर्शनचा प्रकार आहे. 

यात गुन्हेगार बनावट प्रोफाईल बनवतात त्यानंतर ते अनोळखी लोकांशी ऑनलाईन घट्ट मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एकदा ओळख झाली की, ते त्यांच्या पीडितांना नग्न फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी प्रोत्साहित करतात. व्हिडीओ कॉल करत नग्न होण्यास सांगतात आणि तो फोन रेकॉर्ड करतात. एकदा त्यांच्याकडे असे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर त्यांना हे व्हिडीओ पाठवून छळ करतात. पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देतात.

लैंगिक आकर्षणामुळे तरुणांचा बळी

सेक्सटॉर्शनसारख्या गुन्ह्यात अडकणाऱ्यात सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आहे. त्यात 19 ते 27 वर्षांच्या तरुणांचं प्रमाण जास्त आहे. कामाचा  ताण, एकटेपणा आणि सोशल मीडियावरुन होणारी घुसमट यातून मार्ग काढण्यासाठी तरुण अशा प्रकारच्या जाळ्यात ओढले जातात. या सगळ्यात लैंगिक आकर्षण असतं. त्यामुळे मुलीबरोबर सेक्स चॅट करतात. या व्हिडीओच्या माध्यामातून तरुणांच्या गरजा पूर्ण होण्यात थोड्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे सहजपणे तरुण असे कृत्य करतात, असं तरुणांच्या मानसिकतेचा अभ्यास करणाऱ्या डॉ. श्वेता येवले सांगतात.

शेवट आत्महत्यानेच का?

पुण्यातील दोन्ही तरुणांनी  सेक्सटॉर्शनच्या जाण्यात अडकल्यावर आत्महत्येचा पर्याय निवडला. यासाठी आपला समाज आणि सोशल मीडिया काही प्रमाणात जबाबदार आहे. दोघांनांही समाजात बदनामी होईल याची भीती वाटली. त्याउलट त्यांनी जवळच्यांशी किंवा पोलिसांशी चर्चा केली असती तर टोकाचं पाऊल उचललं नसतं. यावर सोपा उपाय आहे. तुम्हाला पाठवलेला किंवा मॉर्फ केलेला फोटो तुम्हीच सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यासंदर्भातील स्पष्टीकरण देऊ शकता. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विरोधात आवाज उठवायला हवा. अनेकांशी संवाद साधायला हवा, जेणेकरुन अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचललं जाणार नाही, असं रोहन न्यायाधीश सांगतात. 

संवादाच्या अभावामुळे संकोच 

आपल्याला आपलं पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल आयुष्य नीट सांभाळता आलं पाहिजे, सध्याच्या पिढीला हे सांभाळता येत नाही. अनेकांचा स्क्रीन टाईम हा 16 तासांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे कुटुंबात आणि मित्र परिवारात गप्पा होत नाही. संवादाचा अभाव असल्याने आपण एखादी घटना घडली आणि ती कोणाला तरी सांगितली तर त्यावर कोण कशी प्रतिक्रिया देईल, याची भीती असते. त्यामुळे संवाद वाढवला तरच अनेकांचा या सायबर गुन्ह्यांच्या किंवा इतर गुन्ह्यांच्या माध्यमातून जाणारा जीव वाचू शकेल, असंही ते सांगतात. 

शाळेपासून सायबर सिक्युरीटीचे धडे द्या

तिसरी आणि पाचवीपासून भारतातील शाळांमध्ये संगणाकाचं शिक्षण दिलं जातं. सातवी-आठवीत असताना लैंगिकतेचं शिक्षण दिला जातं मात्र काळानुसार या दोन्ही शिक्षणामध्ये सायबर सिक्युरीटीचं शिक्षण देण्याची गरज आहे. आपल्या हातात असलेला मोबईल जग जवळ आणू शकतो हे मुलांना माहिती आहे. शालेय मुलांसाठी माहितीचं महत्वाचं स्त्रोत मोबाईल बनला आहे. मात्र यासोबतच मोबाईल कसा हाताळायचा याचं शिक्षण देणं गरजेचं आहे. त्यामुळे वयात येताना या मुलांना गुन्ह्यांची माहिती मिळेल आणि मुलं अत्यंत हुशारीने ते मोबाईल वापरतील. याचा येत्या काळातील सायबर गुन्ह्यांच्या संख्येवर देखील परिणाम होईल, असं न्यायाधीश सांगतात. 

पालकांना सायबर साक्षर करुया

लहानपणी पालकांनी आपल्याला शिष्टाचाराचे धडे दिले. त्यामुळे आपण आज उच्च पद किंवा चांगल्याप्रकारे समाजात वावरु शकतो. अनेक पालक आपल्या मुलांपासून लांब राहतात. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. अनेक मेसेज फॉर्वर्ड करणं किंवा अनेक लिंक सर्रास शेअर करतात. त्यामुळे आता तरुणांनी या सगळ्या जाण्यात न अडकता आपल्या पालकांना सायबर साक्षर करणं गरजेचं आहे. त्यांना मोबाईलवरुन होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती उदाहरणासह सांगण्याची गरज आहे. नाहीतर भविष्यात सायबर गुन्ह्यामध्ये अडकणाऱ्यांमध्ये वयस्कांचं प्रमाण जास्त असेल, असं न्यायाधीश म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget