एक्स्प्लोर

MPSC च्या जाहिरातीत आरक्षणानुसार जागावाटप नाही; धनगर, वंजारी समाजाच्या विद्यार्थ्यांचा आरोप

एमपीएससीची पीएसआय, एसटीआय, एएसओ पदांसाठी काल (28 फेब्रुवारी) जाहिरात निघाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण 806 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. धनगर समाजाला 24 जागा मिळणं अपेक्षित असताना फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. तर वंजारी समाजासाठी एकही जागा निघाली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षकपदाच्या 650 जागांसाठी निघालेल्या एका नव्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. यामध्ये आरक्षणानुसार जागावाटप झाला नसल्याचा आरोप एमपीएससीची तयारी करणाऱ्या धनगर आणि वंजारी समाजाच्या  विद्यार्थ्यांनी केला आहे. हा प्रश्न धनगर आणि वंजारी समाजाशी निगडीत आहे. धनगर समाज हा एनटीसी तर वंजारी समाज हा एनटीडी प्रवर्गात मोडतो. एमपीएससीची पीएसआय, एसटीआय, एएसओ पदांसाठी काल (28 फेब्रुवारी) जाहिरात निघाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण 806 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 650 जागा आहेत. परंतु या पदांमध्ये आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाला 24 जागा मिळणं अपेक्षित असताना फक्त दोन जागा मिळाल्या आहेत, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. तर वंजारी समाजासाठी एकही जागा निघाली नाही, असं या मुलांनी सांगितलं. आयोगाने नेमक्या कोणत्या निकषावर या जागा काढल्या, अशी विचारणा विद्यार्थ्यांनी केली आहे. जातींना ठरलेल्या आरक्षणाप्रमाणे एमपीएससीने जागा काढाव्यात अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे. धनगर, वंजारी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा आक्षेप 650 जागांपैकी 475 जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित केलेल्या आहेत. शासन निर्णयाप्रमाणे यापैकी दोन टक्के जागा एनटी - ड (भज - ड) प्रवर्गासाठी आरक्षित असणं अपेक्षित होतं. परंतु या प्रवर्गासाठी जाहिरातीत एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे एनटी - क (धनगर) प्रवर्गासाठी आरक्षित जागांपैकी 3.5 टक्के जागा आरक्षित असायला हव्या होत्या, परंतु या प्रवर्गासाठी केवळ दोन जागा देण्यात आल्या आहेत. धनजंय मुंडे गृहमंत्र्यांची भेट घेणार! दरम्यान एनटी- ड व एनटी - क प्रवर्गातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर व्हावायासाठी येत्या दोन दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत तातडीची बैठक घेणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दोन्ही प्रवर्गासाठी शासन निर्णयाप्रमाणे जागा आरक्षित करुन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी विनंती गृहमंत्र्यांना करणार असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले. MPSC च्या जाहिरातीत आरक्षणानुसार जागावाटप नाही; धनगर, वंजारी समाजाच्या विद्यार्थ्यांचा आरोप MPSC परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज नोंदणीची तारीख - 28 फेब्रुवारी 2020 ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख - 19 मार्च 2020 प्रीलिम्स परीक्षेची तारीख - 3 मार्च 2020 कोणत्या पदांसाठी किती जागा? पोलीस उपनिरीक्षक (PSI)- 650 पद सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) - 67 पद राज्य कर निरीक्षक (STI)- 89 पद MPSC शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील विद्यार्थ्याकडे पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. शारीरिक पात्रता पुरुष •उंची – 165 सेंमी •छाती – 79 सेंमी महिला उंची – 157 सेंमी वयोमर्यादा: •पीएसआय - 19 ते 31 वर्ष •एएसओ आणि एसआयटी – 18 ते  38 वर्ष निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड ही चाचणी आणि मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारावर केली जाईल. अर्ज कसा दाखल करायचा? पात्र उमेदवार महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर www.mahampsc.mahaonline.gov.in 19 मार्च 2020 पर्यंत यासाठी अर्ज करु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Pune Chakan MIDC: खड्ड्यांमुळे चाकण MIDC चे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
खड्ड्यांमुळे चाकण MIDCचे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Embed widget