एक्स्प्लोर
Advertisement
स्वदेशी बनावटीचं हेलिकॉप्टर, सांगलीच्या ध्येयवेड्या तरुणाची धडपड
अवघं दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या प्रदीप मोहितेने हेलिकॉप्टर तयार करुन लहानपणीचं स्वप्न साकारलं आहे.
पिंपरी चिंचवड : आतापर्यंत आपण स्वदेशी विमान पाहिलं आहे, मात्र सांगलीच्या एका तरुणाने स्वदेशी बनावटीचं हेलिकॉप्टर तयार केलं आहे. अवघं दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या प्रदीप मोहितेने हेलिकॉप्टर तयार करुन लहानपणीचं स्वप्न साकारलं आहे.
सांगलीतील वांगीत राहणाऱ्या ध्येयवेड्या प्रदीप मोहितने लहानपणापासूनच हेलिकॉप्टर साकारण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. 2009 साली त्याने चारचाकी वाहनांचं गॅरेज टाकलं, तेव्हा हे स्वप्न धूसर होतंय की काय, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र तितक्यात आमीर खानचा 'थ्री इडियट्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रदीपची उमेद पुन्हा जागी झाली.
एक-दोन नव्हे तर प्रदीपने सात हेलिकॉप्टर साकारली आहेत. या वेडापायी गेल्या नऊ वर्षात प्रदीपने चाळीस लाख रुपये खर्ची घातले आहेत. प्रदीपला या हेलिकॉप्टरचं पेटंट मिळालं आहे.
प्रदीपचा हा नाद पाहून एअर फोर्समधून निवृत्त झालेले हेलिकॉप्टर पायलट संजय वझे यांनी वेळीवेळी त्याला मार्गदर्शन केलं. हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड कंपनीसोबत प्रदीपची त्यांनी भेटही घडवून आणली. त्या कंपनीने याची दखल घेत ध्रुव पुरस्काराने त्याला सन्मानितही केलं. आता सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
आर्थिक स्थिती खालावल्याने प्रदीपने पिंपरी चिंचवड गाठलं. इथेही चारचाकी गॅरेज चालवत तो त्याचा नाद जोपासत आहे. या पठ्ठ्याचा हा अविश्वसनीय नाद पाहण्यासाठी सध्या मोठी गर्दी होत आहे. सेल्फीही काढले जात आहेत.
साताऱ्याच्या अमोल यादवने मुंबईतील राहत्या घराच्या छतावर स्वदेशी विमान साकारलं, तर आता प्रदीपने हे स्वदेशी हेलिकॉप्टर. भारतात टॅलेंटची कमतरता नाही. पण प्रदीपच्या हेलिकॉप्टरला गगनभरारी घेण्यासाठी आर्थिक हातभारही तितकाच गरजेचा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
राजकारण
क्रिकेट
भारत
Advertisement