एक्स्प्लोर

पोलिसांची सुरक्षा भेदत मंत्री चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर शाई फेकणारा युवक नेमका कोण?

चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकणारा व्यक्ती कोण आहे, याबाबत माहिती मिळाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या व्यक्तिचं नाव मनोज भास्कर गरबडे असं आहे.

Chandrakant Patil News: पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil in Pune) हे चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. यानंतर पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मी कुणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोरुन या, असं म्हटलं. दरम्यान चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil update) यांच्या तोंडावर शाई फेकणारा व्यक्ती कोण आहे, याबाबत माहिती मिळाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या व्यक्तिचं नाव मनोज भास्कर गरबडे (Manoj Garbade) असं आहे.

मनोज हा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मनोजच्या सोबत विजय धर्मा ओव्हाळ आण धनंजय ईचगज या दोन कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं आहे. मनोज गरबडेनं चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली आणि तिथं घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान मनोज गरबडेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट सुरु झाल्या आहेत. अनेकजण त्याच्या समर्थनार्थ पुढं येत असल्याचं दिसत आहे. 

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचा शुभारंभ करायला आले होते.  कार्यक्रमस्थळी पोहचण्यापूर्वी मनोद गरबडेनं चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. एका पदाधिकाऱ्याच्या घरातून ते कार्यक्रमस्थळी निघाले होते. तेंव्हाच मनोद गरबडेनं थेट त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली अन् त्यांनी महात्मा फुलेंच्या घोषणा दिल्या. खरंतर विरोधी पक्ष आणि समविचारी संघटनांकडून चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वादग्रस्त वळतव्याचा निषेध नोंदवला जाणार होता. त्यामुळं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यातून ही शाईफेकीची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी शाई फेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

शाईफेकीनंतर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी कुणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणं, दिलगिरी व्यक्त केली असतानाही असा भ्याडपणे हल्ला करणं चुकीचं आहे. हिंमत असेल तर समोरुन या. सगळं पोलिस डिपार्टमेंट बाजूला करतो. ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही. याचं जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहतील. आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छुट दिली असती तर काय झालं असतं. मात्र ही आमची संस्कृती नाही. शब्दाला शब्दाने टक्कर देता येते. मी काल आणि आजही दिलगिरी व्यक्त केली. गिरणी कामगारांचा मुलगा या स्टेजपर्यंत जाणं सरंजामी लोकांना झेपत नाही. त्यामुळं हे भ्याड हल्ले चालले आहेत. उद्यापासून पोलिस प्रोटेक्शनही नसेल, हिंमत असेल तर समोर या, असंही पाटील म्हणाले.  ही झुंडशाही आहे, लोकशाही नाही. हा बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. पैठणमध्ये जे बोललो त्याचा विपर्यास केला आहे. मात्र पराचा कावळा केला गेला, लोकसहभागातून शाळा उभारल्या असं म्हणण्याऐवजी मी ग्रामीण भाषेत बोललो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कायदा हातात घेऊ नका

कार्यकर्त्यांना मी सांगतो की आपापल्या ठिकाणी परत जा. मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कायदा हातात घेऊ नका. काही कार्यकर्ते रडले मी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.  मी लढणार माणूस आहे, रडणारा नाही. आता विरोधी पक्षांनी बोलावं की ही झुंडशाही चालणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे यांनी या घटनेची निंदा करावी, असं देखील चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे. 

ही बातमी देखील वाचा

Chandrakant Patil : शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, मी कुणाला घाबरत नाही, ही तर झुंडशाही, हिंमत असेल तर समोरुन या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
×
Embed widget