एक्स्प्लोर
पुण्यात अमित शाह आणि बाबासाहेब पुरंदरेंची भेट
या भेटीत त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षातील योजना आणि कामकाजाची माहिती दिली. यापूर्वी पुण्यात अमित शाह यांनी ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचंही दर्शन घेतलं.

पुणे : संपर्क फॉर समर्थन या अभियानांतर्गत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षातील योजना आणि कामकाजाची माहिती दिली.
यापूर्वी पुण्यात अमित शाह यांनी ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचंही दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते.
संपर्क फॉर समर्थन या अभियानांतर्गत अमित शाह आणि भाजपचे केंद्रातील मंत्री देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या भेटी घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी मुंबईत अभिनेत्री माधुरी दीक्षित, उद्योगपती रतन टाटा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
काय आहे संपर्क फॉर समर्थन?
भाजपकडून एनडीएतील मित्रपक्षाच्या नेत्यांचीही भेट घेतली जात आहे. हे अभियान म्हणजे संघाने भाजपला दिलेला कानमंत्र आहे. इंग्लंडमध्ये मजूर पक्षाने आपल्या कामगिरीचं परीक्षण करण्यासाठी लिस्टन टू ब्रिटन्स किंवा लेबर पार्टी लिसन्सचा ऐतिहासिक प्रयोग केला होता. त्याच धर्तीवर देशाच्या विविध क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी त्यांना अगदी घरी जाऊन भेटायचं, त्यांची सरकारबद्दलची मतं जाणून घ्यायची, असा हा कार्यक्रम आहे. सध्या बौद्धिक वर्तुळात सरकारची जी निगेटिव्ह प्रतिमा बनत चाललीय ती पुसून काढण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आपल्या पक्षाला, आपल्या विचारसरणीला कशी सर्व स्तरांमध्ये स्वीकृती आहे, हे दाखवण्याचाच हा प्रयत्न.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट























