(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MHADA News : हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या 5,915 घरांच्या सोडतीसाठी आजपासून नोंदणी
MHADA News : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील म्हाडाच्या 5915 सदनिकांच्या सोडतीसाठी नोंदणीची सुरुवात आजपासून सुरु होणार आहे.
MHADA News : म्हाडाच्या (MHADA News) घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील म्हाडाच्या 5,915 सदनिकांच्या सोडतीसाठी नोंदणीची सुरुवात आजपासून (5 जानेवारी) सुरु होणार आहे. पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील म्हाडा भवनात (Mhada Bhavan Pune) या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजता मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या हस्ते नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पुणे मंडळाच्या 5,915 घरांच्या सोडतीच्या प्रक्रियेलाही सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांच्या हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तर नोंदणी केलेल्या या सदनिकांची सोडत 17 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीर होणार आहे.
सॉफ्टवेअर अपडेटमुळे दिवाळीत सोडत रद्द केली होती
ऑक्टोबर महिन्यात मुंबई, पुणे आणि कोकण या तिन्ही विभागाची सोडत रद्द करण्यात आली होती. सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम सध्या सुरु होतं आणि तेच कारण पुढे करत म्हाडाने अचानक सोडत रद्द केली होती. राज्यभरातील सर्वसामान्य या सोडतीची वाट बघत होते. अचानक रद्द केल्याचं त्याचं दिवाळीतील घराचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. मात्र आता नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून नवीन प्रक्रियेला मंजुरी मिळाल्याने एकच नोंदणी सेवा सुरु होत आहे आणि पुणे मंडळाच्या सोडतीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात होणार आहे.
संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन
म्हाडाच्या घरांची सोडत आणि ताबा प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत यापुढे हस्तक्षेप होणार नाही. म्हाडाच्या घरांची व्रिक्री करण्यासाठी म्हाडाने आपल्या संगणकीय सोडत प्रणालीत महत्वपूर्ण बदल केले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही सोडत प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सोडत आज्ञावली अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. म्हाडाच्या राज्यभरातील गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या विक्रीसाठी IHLMS 2.0 (Integrated Housing ottery Management System) ही संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया हाताळली जाणार आहे.
पुण्यात 5,915 घरांची सोडत
पुणे मंडळाच्या 5,915 घरांच्या सोडतीच्या प्रक्रियेलाही सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांच्या हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या सदनिकांची सोडत 17 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीर होणार आहे.