एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar : चंद्रकांत पाटलांच्या मार्फत माझ्यावर मोक्का लावण्याची तयारी, रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप

Ravindra Dhangekar On Pune Crime: मी पुणेकर आहे, सत्य बोलतो. माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी आपण शांत बसणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal Case) पळून गेल्याच्या प्रकरणावर टीका करताना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह त्यांचा निकटवर्तीय समीर पाटील याचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर यांच्या या भूमिकेनंतर पुण्यातील महायुतीत एकच वादळ आल्याचा पाहायला मिळाल होत. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील धंगेकर यांच्या या स्टॅन्डवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी तर मी त्यांच्या 'बॉस'शी बोलेल असं म्हटल होत.

रविवारी एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी धंगेकरांना 'महायुतीत नो दंगा' असा क्लिअर मेसेज दिला होता. माझं रवींद्र धंगेकर यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. धंगेकरांना मी सांगितलं आहे की, महायुतीत दंगा नको. त्यांनी जे सांगितलं की, पुण्यामध्ये कायद्या आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. सर्वसामान्य गोरगरब जनतेला कोणताही त्रास होता कामा नये. पुण्यामध्ये महिला, मुली आणि नागरिकांना निर्भयमध्ये फिरता आलं पाहिजे. कायदा-सुव्यवस्था राखली गेली पाहिजे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होत.

Ravindra Dhangekar PC Today : धंगेकर आपली भूमिका बदलणार का?

उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितल्यानंतर रवींद्र धंगेकर आपली भूमिका बदलणार का? भाजप नेत्यांवर ज्या पद्धतीने धंगेकर टीका करत आहेत त्यामध्ये नरमाई येणार का? हा प्रामुख्याने प्रश्न होता. याच अनुषंगाने रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.

Ravindra Dhangekar On Chandrakant Patil : आपल्यावर मोक्का लावण्याचा प्रयत्न

या पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र धंगेकर यांनी मी पुणेकर आहे, सत्य बोलतो. माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही अशी थेट भूमिका घेतल्याने त्यांच्या रडावर अजूनही भाजपच असल्याचं स्पष्ट झालं. इतकच नाही तर रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. समीर पाटील हा माझ्यावर चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत मोक्का लावणार असल्याचं रवींद्र धंगेकर म्हणालेत.

Ravindra Dhangekar On Pune Crime : लोक म्हणतात, समीर पाटीलला सोडू नका

समीर पाटील हा पूर्वी आर आर पाटलांकडे होता. त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता. मला सांगलीचे लोक रोज भेटतात. ते म्हणतात याला सोडू नका. हा चुकीचा माणूस आहे. समीर पाटील हा माझ्यावर चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत मोक्का लावण्याच्या तयारीत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत माझ्यावर गुन्हे दाखल कसे करायचे हे काम त्याचं सुरू आहे, माझी याला काहीच हरकत नाही असं धंगेकर म्हणाले.

Ravindra Dhangekar News : आवाज कुणीही दाबू शकत नाही

समीर पाटलची जी भाषा आहे ते तो बोलत आहे का? असा सवाल सुद्धा धंगेकरांनी केला आहे. दरम्यान, मी पुणेकर आहे मी सत्य बोलतो. माझा आवाज कोणीही बंद करु शकत नाही. असं म्हणतं धंगेकर यांनी एकाप्रकारे आपण शांत बसणार नाही असं जाहीरच करून टाकलंय. त्यामुळे आता धंगेकर यांच्या भूमिकेमुळे महायुतीत वाद वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

चंद्रकांत दादा पाटील यांच्या निकटवर्तीय समीर पाटील यांनी धंगेकरांना आता कोर्टाद्वारे अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्याचं ठरवलं आहे. मी चंद्रकांत दादा पाटीलकडे कामाला नाही किंवा मी भाजपचा कुठला पदाधिकारी नाही, धंगेकर माझ्यावर खोटे आरोप करत आहेत असं समीर पाटील म्हणाला.

येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी महायुतीतील नेत्यांमध्ये होत असलेले आरोप प्रत्यारोप खरच थांबतील का? का फक्त अशाच पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू होणार आहेत हे पाहावं लागेल.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Malegaon : मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
Embed widget