एक्स्प्लोर
राज ठाकरे माझे चित्रपट पाहणारच : नाना पाटेकर
‘राज माझा चित्रपट पाहणार नाही, असं होणार नाही. मी रागात बोललो होतो. रागावलं म्हणून कुणी आपलं माणूस सोडतो का? राज काल माझा होता, आज आहे आणि उद्याही राहील.’
पुणे : ‘राज माझा चित्रपट पाहणार नाही, असं होणार नाही. मी रागात बोललो होतो. रागावलं म्हणून कुणी आपलं माणूस सोडतो का? राज काल माझा होता, आज आहे आणि उद्याही राहील.’ असं वक्तव्य सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यात केलं. ‘आपला मानूस’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित पत्रकार परिषदेत नाना बोलत होते.
‘माझा प्रेक्षक म्हणून राज कधीच कमी होणार नाही’, असंही नाना यावेळी म्हणाले. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेत फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्यावर बोलताना नाना पाटेकरांनी नाराजी व्यक्त करत मनसेच्या भूमिकेला विरोध केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत नाना पाटेकरांचा समाचारही घेतला होता.
नेमकं प्रकरण काय?
भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर मुंबईत फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर असताना, अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने सूर आळवला होता. "भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता," असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला होता. नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे नाना पाटकेर यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांच्यावर टीका केली होती. "महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केलं. नानाला वाटतं तो चंद्रावरुन पडला आहे, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाही, तेव्हा मनसेने लढा दिला, त्यामुळे नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावं," अशा शब्दात राज ठाकरेंनी नाना पाटेकरवर टीकास्त्र सोडलं होतं. राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर नाना पाटेकर यांनीही उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. "प्रत्येकाला बोलण्याचा, आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं," अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली होती. संबंधित बातम्या :तो चोंबडेपणा मी कशाला करु? : मकरंद अनासपुरे
भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना मनसेचा प्रचार ब्ल्यू प्रिंटने, तर भाजपचा ब्ल्यू फिल्म दाखवून : राज ठाकरेअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement