Raj Thackeray : राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचं ठिकाणं ठरलं? 'या' ठिकाणी होणार सभा
Raj Thackeray Pune Rally News Updates : राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांची पुण्यात सभा होणार आहे. 21 तारखेला राज ठाकरेंच्या सभेचे नियोजन करण्यात आले
![Raj Thackeray : राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचं ठिकाणं ठरलं? 'या' ठिकाणी होणार सभा Raj Thackeray Pune Rally News Updates MNS pune police latest news Raj Thackeray : राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचं ठिकाणं ठरलं? 'या' ठिकाणी होणार सभा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/06bbaf7c8bf52416590dd709ee3bff5d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raj Thackeray Pune Rally News Updates : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांची पुण्यात सभा होणार आहे. 21 तारखेला राज ठाकरेंच्या सभेचे नियोजन करण्यात आले असून मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांकडून परवानगी मागितली होती. त्यानंतर राज ठाकरे यांची सभा पुण्यातील भिडे पुलाशेजारी नदीपात्राच्या रस्त्यालगत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सभेला नियम आणि अटी या विषयी पोलिस निर्णय घेतील, पुणे पोलिसांकडून सभेस्थळाची पाहणी करण्यात येत आहे. अर्थात अद्याप अधिकृत घोषणा याबाबत झालेली नाही. मात्र पुण्यातील मनसे सभेला परवानगी नाकारण्याचं काहीच कारण नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळं याठिकाणीच सभा होणार हे निश्चित झालं आहे.
मनसेनं पोलिसांना दिलेल्या पत्रानुसार राज ठाकरे यांची सभा शनिवार 21 मे रोजी होणार आहे. या सभेसाठी मुठा नदी पात्रातील डेक्कन जिमखाना येथील जागा मनसेकडून निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी सभेला आणि स्पीकर वापराला परवानगी द्यावी अशी मागणी मनसेनं पोलिसांकडे केली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी राजमहल पोहोचले आहे. राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका करणार आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यासाठी देखील आढावा घेणार आहेत.
राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.सर्व विरोधानंतरही राज ठाकरे अयोध्येला जाण्यावर ठाम आहेत. मनसेच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी 11 गाड्यांचे बुकिंग करण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते तेथे पोहोचणार आहेत.
सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या सभेत राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला ते काय उत्तर देणार याकडे देखील लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)