![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Crime News : कौतुकास्पद! रेल्वे कर्मचाऱ्यांनी काही तासातच हरवलेली बॅग तरुणाला केली परत
पुणे स्टेशनवर एका व्यक्तीची बॅग हरवली होती. पुणे स्टेशनवरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी तरुणाला क्रेडिट, डेबिट कार्ड आणि महत्त्वाच्या कागदपत्रांसह हरवलेल्या प्रवाशांच्या बॅग सुरक्षितपणे परत केली आहे.
![Pune Crime News : कौतुकास्पद! रेल्वे कर्मचाऱ्यांनी काही तासातच हरवलेली बॅग तरुणाला केली परत Railway Officer Returns Lost Bags Of Passengers Pune Crime News : कौतुकास्पद! रेल्वे कर्मचाऱ्यांनी काही तासातच हरवलेली बॅग तरुणाला केली परत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/29/a087705d38037af2eab2001500e3bbb7_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Crime News : पुणे स्टेशनवर एका व्यक्तीची बॅग हरवली होती. अत्यंत सतर्कता बाळगून पुणे स्टेशनवरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी संबंधित मालकांना क्रेडिट, डेबिट कार्ड आणि महत्त्वाच्या कागदपत्रांसह हरवलेल्या प्रवाशांच्या बॅग सुरक्षितपणे परत केली आहे.दौंड-इंदोर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना एक प्रवाशी त्याची डेबिट, क्रेडिट कार्ड आणि काही महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे असलेली बॅग प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर विसरला होता. बॅग सापडल्यानंतर ऑन ड्युटी डेप्युटी स्टेशन मॅनेजर अनिल कुमार तिवारी, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे (RPF) जवान रशीद मुलाणी आणि कोच लॉकिंग कर्मचारी बाबू पारधे यांच्या मदतीने आवश्यक चौकशी केल्यानंतर बॅगच्या मालकाची ओळख पटवली आणि ती त्यांना सुखरूप परत केली.
यापुर्वी देखील- हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस मधून प्रवास करणार्या प्रवाशाने प्रवासाच्या शेवटी डब्यातील बॅग चुकून सोडली, ती देखील तिवारी यांनी त्यांना परत केली. बॅगेत प्रवाशाचे जॉब जॉईनिंग लेटर, मोबाईल फोन, ब्लूटूथ आणि काही महत्त्वाचे वैयक्तिक कागदपत्रे होती. त्यांच्या बॅगा सुखरूप परत मिळाल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. त्यांनी आरपीएफ आणि रेल्वे कर्मचार्यांचे त्यांच्या मदतीबद्दल, निष्ठा आणि कर्तव्याच्या भावनेबद्दल आभार मानले.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे 60वर्षीय व्यक्तीचा वाचला जीव
60 वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा पाय ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला असता रेल्वेच्या पोलीस उपनिरीक्षकांनी जेष्ठ व्यक्तीचा जीव वाचवला. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. रविकांत ढोले 60 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. सांगली येथून पालखी सोहळ्यासाठी पुण्यात आले होते. पालखीचं दर्शन घेऊन परत जात असताना हा प्रकार घडला.
पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला
या पुर्वीसुद्धा या प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहे. सगळ्या घटना सीसीटीव्हीत कैद देखील झाल्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आजपर्यंत अनेक रेल्वे अपघात टळले आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांचं कायम कौतुक करण्यात येतं. मात्र नागरिकांंना अनेकदा सतर्क राहण्याचं आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात येतं. तरी देखील अपघातांचं प्रमाण कमी होण्याचं चित्र नाही आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)