एक्स्प्लोर

सलग चौथ्या दिवशी डी.वाय पाटील संस्थांवरची छापेमारी सुरुच

पुणे : पिंपरीतील साहित्य संमेलन असो की पिंपरी पालिकेकडे असलेली मोठी थकबाकी, प्रवेशासाठी देणग्या यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरून सतत वादात राहणाऱ्या डी. वाय. पाटील संस्थेचा ‘कारभार’ या छाप्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.   सलग चौथ्या दिवशी डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या साम्राज्यावर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. नवी मुंबई, कोल्हापूर, पिंपरीतल्या संस्थेच्या कार्यालयात चार दिवसांपासून सुरु असलेल्या छापेमारीमुळे आयकर विभागाच्या हाती काय घबाड सापडलंय. याबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो आहे.   एवढंच नाही तर शिक्षणसंस्थेचे सर्वेसर्वा पी. डी. पाटील यांच्या कोरेगाव पार्कमधील आलिशान घराचीही आयकर विभागानं झडती घेतली. फक्त संस्थाचालक नाही तर संस्थेचे खजिनदार, रजिस्टर , मुख्याध्यापकांच्या घरांची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर येते आहे. वेगवेगळ्या संस्थामधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. यामध्ये कॉलेजमधून महत्वाची कागदपत्रं आणि इतर गोष्टी बाहेर नेताना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.   पिंपरी, आकुर्डी, कोल्हापूर, नवी मुंबई परिसरात डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचा मोठा पसारा आहे. डी.वाय. पाटील ह्यांच्या महाराष्ट्रात अनेक शिक्षणसंस्था आहेत. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूरमध्ये चार इंटरनॅशन स्कूल, मेडिकल, इंजिनिअरिंगच्या अनेक कोर्स संस्थेत शिकवले जातात.  
  • नवी मुंबई, पिंपरी, कोल्हापुरात मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजचा विस्तार
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, नवी मुंबई
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर
  • नवी मुंबईत भव्य डी.वाय. पाटील स्टेडियम
  पण आयकर विभागाच्या छापेमारीमुळे डी वाय पाटलांचं साम्राज्य संशयाच्या भोवऱ्यात अडकलंय.   डी.वाय. पाटील यांच्या संस्था, त्यांचा कमी कालावधीत वाढलेला पसारा, त्यातील पैशांचे व्यवहार आणि संपत्ती सगळंच अजब आहे. सलग चार दिवसांपासून छापेमारीचं सत्र सुरु असतानाही आयकर बोलायला तयार नाही. कार्यालयं सील केली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना एन्ट्री नाहीए. त्यामुळं संशयाचं धुकं गहीरं झालं आहे.   डी.वाय.पाटील हे इंदिरा गांधींचे अगदी विश्वासू मानले जायचे. राजकारणात अपयश आल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात भलामोठा पसारा तयार केला. त्या जोरावरच त्यांना राज्यपालपदही मिळालं. विशेष म्हणजे मोदींचं सरकार आल्यानंतर काँग्रेसच्या एकट्या डी.वाय.पाटलांचं संस्थान खालसा झालं नाही. त्यामुळंच आयकरच्या छापेमारीवर चर्चांना ऊत आला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Diveagar beach Tragedy : 'शिक्षकांनी मुलं रोखण्याचा प्रयत्न केला, मोठा खड्डा होता, लाट आली, ते उलटे झाले अन्...', वाचलेल्या विद्यार्थिनीने सांगितला थरारक अनुभव
'शिक्षकांनी मुलं रोखण्याचा प्रयत्न केला, मोठा खड्डा होता, लाट आली, ते उलटे झाले अन्...', वाचलेल्या विद्यार्थिनीने सांगितला थरारक अनुभव
Raigad Diveagar Beach Death: कुठल्याही गोष्टीचा हट्ट न करणाऱ्या सुमितनं ट्रिपला जाण्याचा हट्ट केला अन्...; एकुलता एक मुलाचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून दुर्दैवी अंत
कुठल्याही गोष्टीचा हट्ट न करणाऱ्या सुमितनं ट्रिपला जाण्याचा हट्ट केला अन्...; एकुलता एक मुलाचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून दुर्दैवी अंत
Raigad Diveagar beach Tragedy : समुद्रातून पाच मिनिटात बाहेर काढलं, तरी आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचे प्राण कसे गेले? कारण आलं समोर
समुद्रातून पाच मिनिटात बाहेर काढलं, तरी आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचे प्राण कसे गेले? कारण आलं समोर
Diveagar beach Tragedy Raigad: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य, विद्यार्थ्यांचे सात मृतदेह, पोलिसांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली पण....
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य, विद्यार्थ्यांचे सात मृतदेह, पोलिसांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली पण....

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke CJP Protest : चला चहा घेऊ, पोलिसांची अभिजीत दिपकेंना ऑफर, मग स्टेशनला नेऊन काय केलं?
चला चहा घेऊ, पोलिसांची अभिजीत दिपकेंना ऑफर, मग स्टेशनला नेऊन काय केलं?
मोठी बातमी : आधी आदित्य ठाकरेला अटक करा, मग माझ्याबद्दल बोला, मीनाक्षी शिंदे आक्रमक, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी धडाधड बोलल्या
आधी आदित्य ठाकरेला अटक करा, मग माझ्याबद्दल बोला, मीनाक्षी शिंदे आक्रमक, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी धडाधड बोलल्या
Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, हसन मुश्रीफ, विनय कोरेंनी ठरावांचं गणित फडणवीसांना सांगितलं
गोकुळच्या जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, हसन मुश्रीफ, विनय कोरेंनी ठरावांचं गणित फडणवीसांना सांगितलं
Kolhapur News: 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची चौकशी, आमदार संजय गायकवाडांचे पोलीस महासंचालकांना पत्र, मालमत्ता जप्त करण्याची मागणी
'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची चौकशी, आमदार संजय गायकवाडांचे पोलीस महासंचालकांना पत्र, मालमत्ता जप्त करण्याची मागणी
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूवरुन आरोप, पण मिनाक्षी शिंदे दिशा सालियन प्रकरणावरच बोलत राहिल्या, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख, म्हणाल्या...
प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूवरुन आरोप, पण मिनाक्षी शिंदे दिशा सालियन प्रकरणावरच बोलत राहिल्या, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख, म्हणाल्या...
Raigad Diveagar beach Tragedy : 'शिक्षकांनी मुलं रोखण्याचा प्रयत्न केला, मोठा खड्डा होता, लाट आली, ते उलटे झाले अन्...', वाचलेल्या विद्यार्थिनीने सांगितला थरारक अनुभव
'शिक्षकांनी मुलं रोखण्याचा प्रयत्न केला, मोठा खड्डा होता, लाट आली, ते उलटे झाले अन्...', वाचलेल्या विद्यार्थिनीने सांगितला थरारक अनुभव
Satara Crime: साताऱ्यात अवघ्या 19 वर्षाच्या लेकीला बापानं आणि चुलत्यानं तोंड आणि नाक दाबून संपवलं; म्हणे, मुलीच्या वागण्यामुळे कुटुंबाची आणि समाजातील प्रतिष्ठा धोक्यात आली
साताऱ्यात अवघ्या 19 वर्षाच्या लेकीला बापानं आणि चुलत्यानं तोंड आणि नाक दाबून संपवलं; म्हणे, मुलीच्या वागण्यामुळे कुटुंबाची आणि समाजातील प्रतिष्ठा धोक्यात आली
Raigad Diveagar Beach Death: कुठल्याही गोष्टीचा हट्ट न करणाऱ्या सुमितनं ट्रिपला जाण्याचा हट्ट केला अन्...; एकुलता एक मुलाचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून दुर्दैवी अंत
कुठल्याही गोष्टीचा हट्ट न करणाऱ्या सुमितनं ट्रिपला जाण्याचा हट्ट केला अन्...; एकुलता एक मुलाचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून दुर्दैवी अंत
Embed widget