एक्स्प्लोर
पहिल्या पत्नीपासून दुसरं लग्न लपवण्यासाठी मेहुणीची हत्या
पुणे : पहिल्या पत्नीच्या बहिणीच्या धमक्यांना कंटाळून पुण्यात एकाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीचं अपहरण करुन तिला ठार मारल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने तिचा मृतदेह जाळून टाकला.
25 वर्षीय तरुणी अश्विनी शिवकुमार परदेशीच्या हत्येचं प्रकरण घटनेच्या एक महिन्यानंतर उघडकीस आलं. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी 28 वर्षीय आरोपी गोविंद अर्जुन ताकभाते याला पोलिसांनी अटक केली आहे.
पहिल्या पत्नीची बहीण म्हणजेच मेहुणी अश्विनी सतत धमकी देत असल्याच्या कारणावरुन गोविंदने तिचं अपहरण केलं. त्यानंतर बार्शी कुर्डूवाडी रोडवरील निर्जन स्थळी नेऊन तिची हत्या केली. कुणालाही थांगपत्ता लागू नये यासाठी तिचा मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला.
आरोपीनं दुसरं लग्न केल्याचं मेहुणीला माहित होतं. मात्र मेहुणीनं पहिल्या बायकोला याबद्दल सांगू नये यासाठी आरोपीने तिची हत्या केली. सहा जानेवारीला हत्या घडली होती, मात्र बुधवारी ती उघडकीस आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement