Pune Crime News: डेटिंग अॅपवरुन राष्ट्रीय खेळाडूची फसवणूक; वेगवेगळं आमिष दाखवून केला लैंगिक अत्याचार
पुण्यात एका महिला खेळाडूची फसवणूक आणि अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रीय खेळाडू असलेल्या या तरुणीने टिंडर डेटिंग अॅपवर एका 50 वर्षीय पुरुषाची विनंती स्वीकारली होती.
Pune Crime News: पुण्यात एका महिला खेळाडूची फसवणूक आणि अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रीय खेळाडू असलेल्या या तरुणीने टिंडर डेटिंग अॅपवर एका 50 वर्षीय पुरुषाची विनंती स्वीकारली आणि त्यांची मैत्री झाली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि मी स्पर्धा परीक्षांचीही तयारी करत आहे. माझ्या फोनवर डेटिंग अॅप डाउनलोड केले. त्याच्या प्रोफाईलशी प्रोफाईल मॅच म्हणून विनंती स्वीकारली. त्यानंतर आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. आरोपींनी तरुणीला वेगवेगळ्या गोष्टींचे आमिष दाखवून मुंबईसह विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले.ती ज्या व्यक्तीला डेट करत आहे तो 50 वर्षीय विवाहित असून त्याला दोन मुले असल्याचे पीडितेच्या लक्षात येताच तिने पुणे शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.
डेटिंग अॅपवर झाली होती ओळख
टिंडर डेटिंग अॅपवर दोघांची ओळख झाली होती. दोघांचे प्रोफाईल मॅच होत असल्याने महिलेने त्या पुरुषाची रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर त्या दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. अनेकदा अशा अॅपच्या माध्यमातून समोरुन कोण बोलत आहे याचा अंदाज घेता येत नाही. त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवून गप्पाला सुरुवात होते. फसवणूक झाल्यावर हे सगळे प्रकार समोर येतात.
विविध शहरात ठेवले शारीरिक संबंध
दोघांमध्ये चांगल्या गप्पा रंगल्याने एकमेकांवरचा विश्वास वाढत होता. मात्र आरोपीने तरुणीला वेगवेगळ्या गोष्टींचं आमिष दाखवून वेगवेगळ्या शहरात घेऊन जात असत. त्यादरम्यान शारीरिक संबंध प्रस्तापित करत असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
सोशल मीडियावरची मैत्री भोवली
पुण्यात हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीने तरुणाकडून 67 लाख रुपये उकळले होते. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एका महिलेने तरुणाकडून तब्बल 67 लाख रुपये उकळले होते. चेतन रवींद्र हिंगमारे (रा. कालेपडळ, हडपसर) निखिल उर्फ गौरव म्हेत्रे (२७, गाडीतळ, हडपसर) आणि एक तरूणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली होती.