Tukaram Supe : सुपेंचे किती छुपे धंदे? आणखी 10 लाखांची रक्कम सापडली
TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणात तुकाराम सुपेंकडे आज 10 लाखांची रोकड मिळाली आहे.
![Tukaram Supe : सुपेंचे किती छुपे धंदे? आणखी 10 लाखांची रक्कम सापडली Pune Tukaram Supe Another Rs 10 lakh was found in the possession of accused Tukaram Supe Tukaram Supe : सुपेंचे किती छुपे धंदे? आणखी 10 लाखांची रक्कम सापडली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/7a531d4dab5173161583cec79489b703_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
TET परीक्षा घोटाळा प्रकरण : टीईटी परीक्षा पेपरफुटीत अटक करण्यात आलेल्या परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडील घबाड संपता संपत नाही. याचं कारण आज तुकाराम सुपेंकडे 10 लाखांची रोकड मिळाली आहे. सुपेंनी ही रोकड जवळच्या व्यक्तीकडे ठेवायला दिली होती. तीच रोकड त्या व्यक्तिनं आज पोलिसांच्या स्वाधीन केली. आतापर्यंत सुपे यांच्याकडून 2 कोटी 57 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे, अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनच्या डीसीपी भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.
TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणात तुकाराम सुपेंच्या घरावर दुसऱ्यांदा धाड टाकली त्यात पोलिसांनी जवळपास दोन कोटींचं घबाड जप्त केलंय. सुपेंच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती मिळाली. पहिल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागले.आणि आत्ता एका व्यक्तीने दहा लाख रुपये आणून दिल्याने एकूण 2 कोटी 57 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहे. दरम्यान जी ए टेक्नॉलॉजीज कंपनीला टी ई टी परिक्षेचे कंत्राट मिळवून देण्यासाठी लायझनींग करणाऱ्या सौरभ त्रिपाठी ला पुणे पोलिसांनी लखनऊमधुन अटक केली आहे.
म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली. यामध्ये सुपे आणि सावरीकरचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- TET परीक्षा घोटाळा प्रकरण : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी घबाड, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
- Mhada Paper Leak Scam : पेपरफुटी प्रकरणात भाजयुमोचा नेता संजय सानपला अटक
- MHADA Paper Leak : महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)