Pune : 31 डिसेंबरला पुण्यातील 2 मुख्य रस्ते बंद; 'या' परिसरात वाहतुकीत बदल, कोणते रस्ते सुरु? कोणते बंद?
पुण्यातील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूकीदेखील बदल करण्यात आले आहेत आणि फर्ग्यूसन रोड आणि महात्मा गांधी रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
New year 2023 pune Road Diversion : नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात (pune) तयारी पूर्ण झाली आहे. पुण्यात 31 डिसेंबरला अनुचित प्रकार घडू नये म्हणून तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अनेक रत्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करतात. त्यामुळे वाहतूकीदेखील बदल करण्यात आले आहेत आणि फर्ग्यूसन रोड आणि महात्मा गांधी रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
दगडूशेठ मंदिर परिसरातील वाहतूकीतील बदल-
- पूरम चौकातून बाजीराव रोडने शनिवार वाडा हा मार्ग बंद करण्यात येणार
पर्यायी मार्ग- पूरम चौकातून टिळक मार्गाने अलका टॉकीज चौकातून इच्छितस्थळी जावे.
अप्पा बळवंत चौक ते पासोड्या विठोबा चौक हा मार्ग बंद असणार आहे
पर्यायी मार्ग- आप्पा बळवंत चौक- बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा व पुढे इच्छीतस्थळी जावे.
स.गो.बर्वे चौक ते पुणे महानगरपालिका भवन तसेच शनिवारवाडा हा रस्ता बंद राहील.
पर्यायी मार्ग-.गो.बर्वे चौक- जंगली महाराज रोडमार्गे झाशीची राणी चौकातून इच्छितस्थळी जावे.
गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक हा रस्ता देखील बंद असणार आहे.
पर्यायी मार्ग- गाडगीळ पुतळा-डावीकडे वळून कुंभारवाडा किंवा सूर्या हॉस्पिटल समोरून इच्छितस्थळी जाता येईल.
पुणे कॅम्प परिसरातील वाहतूकीतील बदल-
वाय जंक्शन वरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक ही 15 ऑगस्ट चौकात बंद करण्यात येणार आहे
पर्यायी मार्ग- कुरेशी मस्जिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
-इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट मार्गाने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
-इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल.
-सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे पुढे सोडण्यात येईल.
फर्ग्युसन रोड आणि महात्मा गांधी रोड बंद
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (एफसी रोड) आणि महात्मा गांधी रस्ता (एमजी रोड) वाहनांसाठी बंद राहणार आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री गर्दीचा आढावा घेऊन वाहनांसाठी हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. एफसी रोड आणि एमजी रोड या दोन्ही रस्त्यांवर 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात तरुणाई एकत्र येते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. यामुळे हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.