Pune Terrorist Case : पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट; सराफा दुकानातून लुटलेल्या सोन्याचा टेरर फंडिंगसाठी वापर केल्याचं समोर!
पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सराफा दुकानातून लुटलेल्या सोन्याचा टेरर फंडिंगसाठी वापर केल्याचं तपासात समोर आलं आहे.

पुणे : पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी (Pune Terrorist Case) मोठी अपडेट समोर आली आहे. सराफा दुकानातून लुटलेल्या सोन्याचा टेरर फंडिंगसाठी वापर केल्याचं तपासात समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना पकडलं होतं.या दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे दोघांनीही साताऱ्यातील सोन्याचे दुकान लुटलं होतं.
मोहम्मद इमरान मोहम्मद युनूस खान, मोहम्मद याकूब साकी या 2 दहशतवाद्यांना 18 जुलै रोजी अटक पुणे पोलिसांनी केली होती. इमरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलं होतं. संपूर्ण चौकशी केली असता. त्यांनी देशविरोधी कृत्य केल्याचं समोर आलं. त्यातच हे प्रकरण नंतर एनआयएकडे पुढील तपासासाठी देण्यात आले होते. हे दोघेही मोस्ट वॉन्टेड आरोपी होते. याच दोघांनी टेरर फंडिंगसाठी एका सोन्याचं दुकानात लूटलं होतं आणि या सोन्याचा वापर टेरर फंडिंगसाठी केला होता. या दोन्ही दहशतवाद्यांचा आता पुणे पोलीस सखोल तपास करत आहेत.
बॉम्बस्फोटाचा केला होता सराव
या दोघांच्या घराची चौकशी केली असता फॅनच्या वरच्या बाजूला बॉंम्ब बनवण्याची प्रक्रिया लिहून असलेला कागद सापडला होता. त्यानंतर तपासात पुणे पोलिसांनी पकडलेल्या याच इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी (NIA) पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये जाऊन बॉम्बस्फोटाचा सराव केल्याच समोर आलं होतं. त्यासाठी हे दहशतवादी जंगलात तंबू ठोकून काही दिवस राहिले देखील होते. पुण्याजवळच्या पानशेत जवळच्या दाट झाडींमध्ये, त्याचबरोबर सातारा शहराच्या जवळ असलेल्या झाडींमध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात या दहशतवाद्यांनी हा सराव केल्याचं समोर आलं होतं. त्यासाठी हे दहशतवादी महाराष्ट्र-बेळगाव सीमाभागातील निपाणी आणि संकेश्वरमध्ये काही दिवस मुक्कामाला देखील होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली होते.
या सगळ्या संस्थेत सक्रिय
ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे. या सगळ्या संस्थांमध्ये हे दोघे काही प्रमाणात संलग्न असल्याचं समोर आलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
