एक्स्प्लोर

Pune Success story : शिवरीच्या मनीषा कामथे बनल्या 'मसाला क्वीन'; दर 15 दिवसाला विकतात 800 किलो मसाला

पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील मनीषा संतोष कामथे यांनी घरगुती डंका व्यवसायातून सुरूवात करत मसाला आणि सहउत्पादने निर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल सुरू ठेवली आहे.

Pune Sucess story : इच्छाशक्ती आणि संघर्षाच्या बळावर (success story) शून्यातून भरारी घेता येते हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील मनीषा संतोष कामथे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी घरगुती डंका व्यवसायातून सुरूवात करत मसाला आणि सहउत्पादने निर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यांच्या उत्पादनांची आणि संघर्षाची दखल संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (युएनडीपी) घेतली आहे.

दहावीपर्यंत शिकलेल्या मनीषा यांना शेती व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि तीन मुलांच्या शिक्षणासाठी खर्चाची जुळवाजुळव करणं कठीण जात होतं. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी मावसबहिणीच्या सल्ल्याने 2019 मध्ये एक लहान मसाला यंत्र (डंका) घेऊन मसाले कुटून देण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ग्राहकांचे मसाले कुटून देण्याचे काम केले. त्यानंतर पती संतोष कामथे यांच्या मदतीने त्यांनी बाजारातून चांगल्या प्रकारची मसाल्याची साधनसामुग्री आणून विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली. जोडीला शेवई यंत्र खरेदी करुन शेवई तयार करुन देण्याचा व्यवसायही सुरू केला. स्वत:ही हे पदार्थ तयार करुन विक्रीदेखील सुरू केली. एक वेगळी आणि अस्सल चव राखल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला.

शिवरीतील ग्रामविकास स्वयंसहाय्यता समूहाने मनीषाला सासूच्या जागी सदस्य करून घेतले. 2021मध्ये बँक ऑफ बडोदाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत (आरसेटी) बचत गटांसाठी आयोजित 10 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात 40 प्रकारचे मसाले, लोणचे, शेवया, पापड आदी पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी बँकेच्या कर्जासह पंचायत समितीकडून 40 हजार रुपये बीजभांडवल घेतले. त्यातून नवीन यंत्रे घेऊन व्यवसायाचा विस्तार केला. या माध्यमातून चार प्रकारचे लोणचे, शेवई, सांडगे, पापड, कुरडई, पापडी, बटाटा वेफर्स, खारवडे आदी पदार्थही बनवण्यास सुरुवात केली. 

ऑगस्ट 2022मध्ये बारामती अॅग्री गटाच्या माध्यमातून मनीषा यांची ‘फार्म दीदी’ या संस्थेची ओळख झाली. मनीषा यांनी बनवलेल्या दर्जेदार उत्पादनांमुळे संस्थेने प्रशिक्षणासह संस्थेसाठी पदार्थ बनवून देण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्यानुसार लसूण लोणचे, लसूण चटणी, लिंबू मिरची लोणचे, चिली आदी पदार्थ बनविण्यास सुरूवात केली. सुरुवातीच्या 50 ते 60 किलोच्या ऑर्डरपासून आता दर पंधरा दिवसाला 800 किलोपर्यंत ऑर्डर मिळत आहे.याच बरोबर त्यांनी ‘महालक्ष्मी मसाले’ या नावाने मसाल्याचा स्वत:चा ब्रँड केला असून हळूहळू त्याला मागणी वाढत आहे. थेट केरळमधून खरेदी करण्यात येत असलेल्या लवंग, मिरी, दालचिनी आदी मसाला सामग्रीमुळे मसाल्यांना अस्सल सुगंध आणि चव येते, असे मनीषा सांगतात. मसाले तयार करुन घेण्यासाठी दूरवरून ग्राहक येतात. त्यांच्या मसाले तसेच इतर पदार्थांचे मार्केटिंग कोकणापर्यंत पोहोचले आहे. 

त्यांचा ग्रामविकास स्वयंसहाय्यता समूह कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेशी जोडला असल्याने बारामती येथे झालेल्या ‘कृषिक-2023’ प्रदर्शनात, उमेद अभियानाद्वारे पुणे विभागीय सरस विक्री प्रदर्शन ‘दख्खन जत्रा’ मध्ये स्टॉल उपलब्ध करुन दिला. यावेळी मनीषा यांच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री आणि जाहिरात झाली. मनीषा कामथे यांनी ‘फार्म दीदी’ संस्थेला पुरवलेल्या पदार्थांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या युएनडीपीकडून विशेष पुरस्कार मिळाला आहे. युनडीपीच्या प्रतिनिधींनी मनीषा यांच्या युनिटची पाहणी करीत त्यांच्या संघर्षाची यशोगाथा बनवून जगभरात प्रसारित केली. खऱ्या अर्थाने त्यांच्या संघर्षाला झळाळी मिळाली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Traffic Update: पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
Rohit Pawar: सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप! बारामतीत घडामोडींना वेग, रोहित पवारांची टीका, चंद्रकांत पाटलांनीही दिलं उत्तर
Pune News : पुण्यात भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी, वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून राडा; बुलडाण्यात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधला वाद शिगेला
पुण्यात भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये तुफान खडाजंगी, वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून राडा; बुलडाण्यात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधला वाद शिगेला
Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: ठाणे, पुणे, सोलापूरपासून सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार, पाहा A टू Z माहिती
ठाणे, पुणेपासून सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार, पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajat Patidar: या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
Prajakta Mali On Devendra Fadnavis: अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
Gautam Gambhir: 'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
Satara News: महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
Embed widget