पुण्यात भीषण अपघात! कारला धडकून बस पलटली अन् हॉटेलमध्ये घुसली; एकाचा मृत्यू, 25 जखमी
Pune Accident News CCTV: पुण्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे.या अपघाताची भीषण दृश्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. हे दृश्य पाहून आपल्या अंगावर काटा उभारल्याशिवाय राहणार नाही.
![पुण्यात भीषण अपघात! कारला धडकून बस पलटली अन् हॉटेलमध्ये घुसली; एकाचा मृत्यू, 25 जखमी Pune shirur Accident Latest Update bus car accident 1 dead 25 injured पुण्यात भीषण अपघात! कारला धडकून बस पलटली अन् हॉटेलमध्ये घुसली; एकाचा मृत्यू, 25 जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/56b1b59a4d68b5bda709232efba73ee5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Accident : पुण्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. एका कारला धडकून लक्झरी बस पलटी झाली आणि थेट हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्यातील या अपघाताची भीषण दृश्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. हे दृश्य पाहून आपल्या अंगावर काटा उभारल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात 10 तारखेच्या रात्री 11.25 च्या सुमारास मौजे बजरंगवाडी, शिरूर येथे झाला.
पुणे अहमदनगर महामार्गाचे पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या रोडवर एका कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती कार महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिवायडरच्या कठड्यास धडकली. हा अपघात इतका भीषण होता की ती कार पुण्याहून पुढे अहमदनगरच्या दिशेने चाललेल्या लक्झरी बसला धडकली. या अपघातात त्या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात लक्झरी बस मधील चालकासह 22 ते 25 जण जखमी झाले आहेत. यातील 5 जण गंभीर असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ती धडक जोरात असल्याने बस पलटी होऊन घासत जाऊन अहमदनगर बाजूकडील रस्त्याच्या उत्तरेस असलेल्या रॉयल पॅलेस हॉटेलच्या मुख्य दरवाज्यात घुसली.
मुलांना शाळेत घेऊन निघालेल्या रिक्षाला अपघात, 8 विद्यार्थी जखमी
मुलांना शाळेत घेऊन निघालेल्या रिक्षाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात आठ मुले जखमी झाली असल्याची माहिती आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळीकांचन येथील खेडेकर मळा परिसरात आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मुले बोरीभडक गावच्या हद्दीत राहणारी आहेत. मुलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. रिक्षा चालकही जखमी झाला आहे. उरळीकांचनमधील एका दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)