एक्स्प्लोर

Pune Rain : पुण्यात पावसामुळे दाणादाण; तासाभरात 26 मिमी पावसाची नोंद, कुठे वाहतूक कोंडी तर कुठे झाडपडीच्या घटना

Pune Rains : पुण्याच्या अनेक परिसरात मंगळवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. सायंकाळी 7 नंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर आणि लोहेगाव या दोन्ही भागात रात्री 8.40 वाजेपर्यंत 26 मिमी पावसाची नोंद झाली.

पुणे : पुण्याच्या अनेक परिसरात मंगळवारी (26 सप्टेंबर) संध्याकाळी (Pune Weather Update) मुसळधार पाऊस पडला. सायंकाळी सात वाजल्यानंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर आणि लोहेगाव या दोन्ही भागात रात्री 8.40 वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटासह 26 मिमी पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शिवाय गणपती मंडपात देखील भाविकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. शिवाजीनगर, पेठ परिसर, डेक्कन, कोथरुड, कर्वेनगर, विश्रांतवाडी, कात्रज, बाणेर, पाषाण, कोंढवा, सिंहगड रोड, लोहेगाव, हडपसर यासह विविध भागात मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर जोरदार पाऊस झाला.

मुसळधार पावसामुळे शहराच्या काही भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मध्यवर्ती भागातील गणेश मंडळांवर गर्दी करणाऱ्या अनेक भाविकांची अचानक आलेल्या पावसाने प्रचंड गैरसोय झाली. दगडूशेठ गणपती, बाबू गेनू गणपती आणि मंडई परिसरात दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हवामान खात्याने काय सांगितलं?

IMD पुणेचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले की, "मंगळवार संध्याकाळी पुणे शहरावर मोठ्या प्रमाणात ढग निर्माण झाले होते आणि त्याचा परिणाम म्हणून शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 72 तासांत मान्सून सक्रिय राहील. दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेत गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आम्ही लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे."

कोणत्या भागात किती पाऊस झाला?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमध्ये गेल्या 24 तासांत 55 मिमी, तर तळेगावमध्ये 50.55 मिमी, पाषाणमध्ये 43 मिमी, शिवाजीनगरमध्ये 37.9 मिमी, लवळेमध्ये 37 मिमी, दापोडीमध्ये 37 मिमी, एनडीएमध्ये 36.5 मिमी, बीएचआरमध्ये 36.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 5 मिमी, कोरेगाव पार्क 29 मिमी, राजगुरुनगर 23 मिमी, मगरपट्टा 22 मिमी, हडपसर 20 मिमी पाऊस झाला.

पावसामुळे झाडपडीच्या घटना...

मुसळधार पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आणि झाड पडण्याच्या घटना घडल्या ज्यामुळे काही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला (पीएमसी) वडगाव शेरी, येरवडा, औंध आणि बिबवेवाडी येथून झाड पडण्याच्या घटनांशी संबंधित चार फोन आले. पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खडकवासला क्लस्टरमधील पाणीसाठा 99.88 टक्के (29.12टीएमसी) च्या तुलनेत 95.84 टक्के (27.94 टीएमसी) वर पोहोचला आहे.

इतर महत्वाची बातमी-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Sharad Pawar : 'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती? 
Sharad Pawar : 'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
'भुजबळ साहेबांना हात जोडून आलो...', बड्या OBC नेत्यांने पक्षप्रवेशानंतर सांगितलं अजितदादांची साथ सोडण्याचं कारण
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Embed widget