एक्स्प्लोर

Pune Rain Update: पुण्यात पावसामुळे झाड कोसळून फूल विक्रेत्या महिलेचा करुण अंत, 20 वर्षांपासून सावली देणारं झाडचं काळ बनून आलं!

Pune Rain Update: पुणे शहरात गुरुवारी दुपारी आलेल्या वादळी पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. या अवकाळी पावसाने पुण्यात 130 वर्षांनंतरचा विक्रम मोडीत काढला.

Pune Rain Update: पुणे शहरात गुरुवारी दुपारी आलेल्या वादळी पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. या अवकाळी पावसाने पुण्यात 130 वर्षांनंतरचा विक्रम मोडीत काढला असला, तरी सिंहगड रस्ता परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका मंदिराशेजारी गेल्या 15-20 वर्षांपासून फूल विक्री करणाऱ्या रंजना नवनाथ गिरी (वय 60) यांच्या अंगावर वडाचे भलेमोठे झाड कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रंजना गिरी (रा. दत्तवाडी) या गेल्या दोन दशकांपासून सिंहगड रस्त्यावरील एका मंदिराशेजारी आपली हातगाडी लावून फुले विकत होत्या. उन्हात आणि पावसात त्यांना याच वडाच्या झाडाने नेहमी आसरा दिला. मात्र, काल दुपारी अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे हेच वडाचे झाड कोसळले. या झाडाखाली रंजना यांच्यासह तिघेजण अडकले होते. पर्वती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र रंजना गिरी यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा 130 वर्षांचा विक्रम मोडला

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात काल झालेला पाऊस हा एप्रिल महिन्यातील एका दिवसात झालेला गेल्या 130 वर्षांतील सर्वाधिक पाऊस ठरला आहे.

2026 ची नोंद: 65 मिलिमीटर.

यापूर्वीचा विक्रम: 1896 मध्ये 51.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

Pune Rain Update: ठिकठिकाणी पडझड आणि वाहतूक कोंडी

केवळ झाड कोसळण्याच्या घटनाच नाही, तर पुण्यातील गंगाधाम चौकात एक अजस्त्र होर्डिंग देखील वादळी वाऱ्यामुळे कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शहराच्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पुण्याच्या ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी गारपीट झाल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मंदिरांना देखील बसला. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात पाणी साचलेलं होतं. काल गुरुवार असल्याने भाविक या दत्त मंदिरात मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. मात्र या मंदिरामध्ये देखील पाणी साचल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Unseasonal Rain : एकीकडे आखातातील युद्धाचा भडका, दुसरीकडे अस्मानी संकटांचा फटका; गारपीट, अवकाळी पावसानं बळीराज्याचा तोंडाचा घास हिरावला

पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी

महत्त्वाच्या बातम्या

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Embed widget