एक्स्प्लोर

Pune : 'सुहाना मसाले- प्रवीण मसालेवाले'चे निर्माते पुण्यातील ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद चोरडिया यांचं निधन

Hukmichand Chordia Passess Away : ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. प्रवीण मसालेवाले या सुप्रसिद्ध ब्रँडचे ते संस्थापक होते.

Hukmichand Chordia Passess Away :  पुण्यातील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. 'सुहाना मसाले- प्रवीण मसालेवाले' (Pravin Masalewale) या सुप्रसिद्ध ब्रँडचे (Masala Brand) ते संस्थापक होते. प्रवीण मसाले या मसाल्याच्या कंपनीची स्थापना त्यांनी केली होती. 1962 मध्ये त्यांनी प्रवीण मसालेवाले या कंपनीची स्थापना केली. आपलं भोजनाचं ताट स्वादिष्ट करणारं अत्यंत विश्वासार्ह नाव म्हणून प्रवीण मसालेवाले या मसाला कंपनीची ओळख आहे.

प्रवीण मसालेवाले हा ब्रँड घरोघरी पोहोचवण्यासाठी हुकमीचंद चोरडियांनी 40-50 वर्ष अविरत कष्ट केले. आज सायंकाळी साडेपाच वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानं उद्योग जगतात शोकाचं वातावरण आहे.

मारवाडी कुटुंबातून आलेल्या चोरडिया यांनी महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या चवीने वेगवेगळे मसाले पुरवले आहेत. चोरडिया हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील. हुकमीचंद चोरडिया यांच्या पत्नी कमलाबाई यांनी मसाले बनवून विकण्याची कल्पना पुढं आणली. यातून मोठ्या उद्योगाची स्थापना झाली. 

वेगवेगळ्या प्रकारचे मसाले प्रवीण मसालेवाले समूहाकडून बनवले जातात. याला खास महाराष्ट्रीय तडका असतो. शाकाहारी, मांसाहारी जेवणासाठी लागणारे प्रत्येक प्रकारचे मसाले प्रवीण मसालेवाले समूहाकडून बनवले जातात. 

प्रवीण मसाले समूहाच्या उत्पादनांची चव महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तर पोहोचली आहेच शिवाय देशाच्या विविध भागात प्रवीणचे मसाले पोहोचले आहेत. या मोठ्या उद्योगाची उभारणी करणारे हुकमीचंद चोरडिया यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं उद्योग जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVEMaharashtra Operation Lotus Special Report : महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'? महाविकास आघाडीला धास्तीParbhani Protest : तोडफोड, मोर्चे, आंदोलनं आणि ठिय्या... परभणी का पेटलं? Special ReportUddhav Thackeray on BMC Election :बीएमसीला ठाकरेंचा पक्ष स्वबळाच्या वाटेनं जाणार का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget