Devendra fadanvis On Pune Pubs And Bar : पुण्यातील बार अन पब्स संदर्भात देवेंद्र फडणवीस थेटच बोलले, म्हणाले नियमांचं...
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघाताला राजकीय वळण मिळालं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल आणि त्यांच्या मुलावर कारवाई करताना पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे.
![Devendra fadanvis On Pune Pubs And Bar : पुण्यातील बार अन पब्स संदर्भात देवेंद्र फडणवीस थेटच बोलले, म्हणाले नियमांचं... Pune Porcshe car accident Devendra Fadnavis spoke directly about bars and pubs rules in Pune Devendra fadanvis On Pune Pubs And Bar : पुण्यातील बार अन पब्स संदर्भात देवेंद्र फडणवीस थेटच बोलले, म्हणाले नियमांचं...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/9ac8a1c8713fbf64fbeb5bf8ac326c181716298149121442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघाताला ( Pune Car Accident) राजकीय वळण मिळालं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल आणि त्यांच्या मुलावर कारवाई करताना पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पुणे पोलीस नीट कारवाई करत नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जात हे. याच प्रकरणी आता देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आणि सगळी माहिती घेण्याच आदेश त्यांनी वरिष्ठ पोलिसांच्या बैठकीत दिले आहेत मात्र पुण्यातील बार आणि पबसंदर्भातदेखील त्यांनी नियमांचं उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचा पोलिसांना सल्ला दिला आहे.
पुण्यातील पबला रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणानंतक पब संदर्भात पुनर्विचार होणार का?, असं विचारल्यास देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रेसिडेन्शियल अर्थात रहिवाशी भागातील पब्ज हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथे आयडेंडिटी आणि वय चेक होत नाही. त्याबाबत एन्फोर्स करणं आणि सीसीटीव्हीने वॉच ठेवणं याबाबत पोलिसांशी चर्चा झाली.
ज्या भागात असे पब्ज आहेत, त्या भागात नाकाबंदी करुन ड्रंक आणि ड्राईव्हबाबत इफेक्टिव अॅक्शन घेणं मोठ्या प्रमाणात सुरु होईल. ज्यांना लायसन्स मिळाले आहेत त्या लायसन्सच्या अटी पाळल्या जात आहेत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश पोलीस, महापालिका आणि उत्पादन शुल्क विभागाला दिले जातील. जिथे नियमभंग आहेत, त्याठिकाणी थेट क्लोजरचे आदेश दिले जातील. ज्या पब आणि बारमधे नियमांचे उल्लंघन केलेले आढळेल ते पब आणि बार बंद करण्यात येतील.नवीन लायसेन्स देताना ती रहिवासी भागांमधे देण्यात येणार नाहीत, असा इशाराही फडणवीसांनी दिला.
पुण्यातील अपघात झाला तो अत्यंत गंभीर असून यामध्ये 304 कलमानुसार गुन्हा नोद करण्यात आला आहे, तसेच मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आरोपी हा अल्पवयीन असला तरी त्याच्यावर वयस्क म्हणून कारवाई करण्यास मान्यता मिळावी अशी मागणी पोलिसांची आहे. त्यामुळे बालहक्क मंडळाच्या आदेशाच्या विरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचंही ते म्हणाले. आरोपीची रिमांड मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असंही फडणवीसांनी सांगितलं.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)