Uddhav Thackeray : पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का;पदासाठी पैशाची मागणी, अनेक पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे, शिंदे गटात प्रवेश करणार
पुण्यातील उबाठा युवासेना मधील अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिले आहेत. दित्य ठाकरेंना पत्र देत या सगळ्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.
पुणे : लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकीकडे उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावला आहे तर दुसरीकडे पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. पुण्यातील उबाठा युवासेना मधील अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिले आहेत. दित्य ठाकरेंना पत्र देत या सगळ्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.पक्षांतर्गत गटबाजी आणि पदासाठी केलेली पैशाची मागणी या गोष्टींना वैतागून अनेकांचे राजीनामे दिल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले पण पदाधिकाऱ्यांकडून घाणेरडी वागणूक मिळाल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हे सगळे पदाधिकारी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश करणार असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. पुण्यातील निवडणूक पार पडली आहे. मात्र येत्या काळात विधानसभेनची निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने पुण्यात उबाठाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पत्रात नेमकं काय लिहिलंय?
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख सप्रेम जय महाराष्ट्र वंदनीय हिंदुहृदयसम्राट, श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या ज्वलंत हिंदुत्व मराठी माणसाच्या प्रेमाबद्दल मागील अनेक वर्ष आम्ही ( उबाठा) युवा सेना वाढवण्यासाठी व नविन युवक संघटना वाढवण्यासाठी आम्ही मनापासून प्रामाणिक प्रयत्न केले आणि काम केले परंतु आपण दिलेल्या पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी घाणेरडी वागणूक आम्हाला दिली गेली. पक्षांतर्गत गटबाजी, शिवसेना पक्ष आणि मतभेद हे कायम पाहायला मिळत होते. व युवासेना पदासाठी पैशाची मागणी केली जात होती. या सर्व त्रासाला वैतागुन आम्ही सर्व युवासेनेचे निष्ठावंत पदाधिकारी सामुहिक राजीनामा देत आहोत. हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्रातील जनतेचे लोकसेवक कार्यक्षम मुख्यमंत्री यांच्या कामाने व खऱ्या शिवसेनेच्या विचाराने प्रेरीत होऊन यापुढे आम्ही खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे व पुर्वेश सरनाईक आणि युवासेना सचिव किरण साळी यांच्यासोबत पुढील राजकिय व सामाजिक काम करण्याचा निश्चय केला आहे. आणि आमच्या सोबत असंख्य पदाधिकारी प्रवेश करत आहे, असं पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना दिलेल्या पात्रात म्हटलं आहे.
ही बातमी वाचा:
- Travel : रिमझिम पाऊस..निसर्गसौंदर्य अन् बेभान मन! पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं पाहाल, तर सगळं टेन्शन विसराल..
- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
- Mahayuti Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र येणार; शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक सभा!