Sunetra Pawar : बारामती लोकसभेत नणंद विरुद्ध भावजय? सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्या; अजित पवारांच्या निकटवर्तीयांचं पक्षश्रेष्ठींना पत्र
बारामती, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली आहे.
बारामती, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी द्यावी मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली आहे. वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यंच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
वीरधवल जगदाळे पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत. सुनेत्रा पवार यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात काम आहे. त्यांच्यासाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली आहे.
वीरधवल जगदाळे यांनी पत्रात नेमकं काय लिहिलंय?
वीरधवल यांनी पत्रात लिहिलंय की, पुढील काही काळातच लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी संदर्भात मी माझे मत मांडू इच्छितो. आपण सध्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना ( शिंदे गट) यांच्याबरोबर सत्तेमध्ये एकत्रित आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघ हा आपल्या हक्काचा आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी भरगच्च असलेला मतदारसंघ आहे. अजितदादांनी देखील यापूर्वी काही काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह, अजितदादा पवार व कुटुंबाप्रती असलेले प्रेम, जनसामान्यांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा असलेला दांडगा संपर्क यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय सोयीस्कर राहणार आहे. माझी आपणास नम्र विनंती आहे की या मतदारसंघात सुनेत्रावहिनी पवार यांचा देखील दांडगा जनसंपर्क आहे. या मतदारसंघाची उमेदवारी सुनेत्रावहिनी यांना मिळावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे तसे झाल्यास कार्यकर्त्यांची काम करण्याची इच्छाशक्ती द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आपण सध्या राज्यात आणि केंद्रात देखील सत्तेत आहोत या गोष्टीचा फायदा या भागातील विकासासाठी होणार आहे. तरी आम्हा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावतीने आपणास नम्र विनंती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नावाचा आपण प्रामुख्याने विचार करावा, अशी विनंतीदेखील त्यांनी या पात्रातून केली आहे.
सुनेत्रा पवार, जय पवार मतदारसंघात अॅक्टिव्ह
सुनेत्रा पवार गेल्या काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघात हळदी-कुंकवाच्या माध्यमातून महिलांची संवाद साधत आहेत. तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमात खासदार सुनेत्रा पवार यांचा वावर वाढला आहे. सोबतच जय पवार देखील मतदारसंघात अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे 2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून ननंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळू शकतो.
इतर महत्वाची बातमी-