एक्स्प्लोर

Pune News : मृत्यूनंतरही देशसेवा! अपघातानंतर उपचाराअभावी पोलिसाचा मृत्यू; दुख बाजूला सारत कुटुंबीयांचा सैनिकाला अवयवदान करण्याचा निर्णय

पुण्यातील पोलीस मृत्यूनंतरही देशसेवा करणार आहे. अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांनी सैनिकाला अवयव दान करुन जीवदान दिलं आहे.

पुणे : मरावे परी किर्ती रुपे उरावे, हे वाक्य पुण्यातील एका  (Pune Police) पोलिसानं सिद्ध केलं आहे. अपघात झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना योग्य मदत मिळाली नसल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे अवयव दान (Organ Donation) करत माणुसकीचा आदर्श ठेवला आहे. मृत पोलिसांच्या कुटुंबीयांच्या कार्याचं सर्वस्तरावरुन कौतुक केलं जात आहे.

10 दिवसांपूर्वी काम आटपून घरी जात असताना राजेश कौशल्ये या पोलिसांचा अपघात झाला. अपघात झाल्यावर कोणीही मदतीला आलं नाही. तडफडत असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे जखमी झाल्यानंतर अर्धा तास कोणतीही मदत न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे माणुसकी जखमी झाली की काय? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र मृत पोलिसांचं कुटुंबियांनी अवयव दान करत माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.

राजेश कौशल्य असे अवयव दान करणाऱ्या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेश कौशल्य हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होते. 2 ऑगस्ट रोजी मध्यरात्री मोशीतील स्पाईन रोड येथे त्यांच्या अपघात झाला होता.

राजेश कौशल्ये हे त्यांच्या कुटुंबीयांचे कर्तेधर्ते होते. पोलीस खात्यातदेखील त्यांचं काम चोख होतं. त्यांच्या अशा प्रकारे जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. कुटुंबातील महत्वाचा व्यक्ती आणि कर्तबगार व्यक्ती गेल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. जर वेळेत मदत मिळाली असती तर आज त्यांचा जीव वाचला असता मात्र आपलं संरक्षण करणाऱ्या पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून मदतीला कोणीही पुढे आलं नाही, जर वेळेत मदत मिळाली असती तर आज राजेश यांचा जीव वाचला असता, अशी खदखद कुटुंबीयांनी बोलून दाखवली आहे. 

कौशल्ये हे पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांना 2 ऑगस्टला घरफोडीसंदर्भात खबरींकडून माहिती मिळाली होती. आतापर्यंत त्यांनी अनेक दरोडे उघडकीस आणले होते. त्यामुळे पोलीस विभागातही त्यांचं भरभरुन कौतुक व्हायचं. 2 तारखेला ते दरोडा विरोधी पथकाच्या कार्यालयातील काम आटपून घरी निघाले होते. मात्र घरी जाताना त्यांच्यावर काळाचा घाला झाला.

किडनी, त्वचा, डोळे आणि ह्रदय या अवयवांचं दान केलं आहे. पुण्यातील रुबी हॉलमध्ये अवयव दान करण्यात आले. त्यांचं ह्रदय पुण्यातील 46 वर्षीय भारतीय सैन्याला दान करण्यात आले आहे.  आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस मध्ये प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Independence Day 2023 Pune : अंध विद्यार्थ्यांच्या हातांच्या ठश्यांनी साकारला तिरंगा; पुण्यात अनोखा स्वातंत्र्य दिन साजरा, पाहा फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 05 November 2024Raju Latkar On Satej Patil : मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिलाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : :16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Embed widget